Join us

भारताच्या विरोधाला न जुमानता पाकिस्तानकडून ‘इर्मजिंग कप’ आयोजनाची तयारी सुरू

भारतीय क्रिकेट बोर्डाच्या कडव्या विरोधाला न जुमानता पाकिस्तानने ‘आशिया इमर्जिंग नेशन्स कप’क्रिकेट आयोजनाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानात स्पर्धा खेळण्यास भारतापाठोपाठ बांगलादेशचाही नकार आला तरी पाक स्पर्धा आयोजनावर ठाम आहे.यजमानपदासाठी बीसीसीआयने विरोध केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आक्रमक पवित्रा घेतला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 01:55 IST

Open in App

कराची: भारतीय क्रिकेट बोर्डाच्या कडव्या विरोधाला न जुमानता पाकिस्तानने ‘आशिया इमर्जिंग नेशन्स कप’क्रिकेट आयोजनाची तयारी सुरू केली आहे. पाकिस्तानात स्पर्धा खेळण्यास भारतापाठोपाठ बांगलादेशचाही नकार आला तरी पाक स्पर्धा आयोजनावर ठाम आहे.यजमानपदासाठी बीसीसीआयने विरोध केल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आक्रमक पवित्रा घेतला. ‘आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत आम्हाला स्पर्धेचे यजमानपद मिळाले. त्यामुळे हक्क आम्ही सोडण्याचा प्रश्नच येत नाही.’ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम सेठी यांच्या भूमिकेमुळे येत्या काही दिवसांमध्ये हा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. भारतासोबत बांगलादेश क्रिकेट बोर्डानेही सुरक्षेचे कारण देत पाकिस्तानात स्पर्धा खेळण्यास नकार दिला आहे.दुबईत झालेल्या आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयने स्पर्धेचे ठिकाण बदलावे, अशी भूमिका घेतली. या भूमिकेला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पाठिंबा दिला. मात्र काहीही झाले तरी आम्ही हक्क सोडणार नाही, असे पीसीबी अधिकाºयाने स्पष्ट केले. भारत -पाक राजकीय संबंध आणि दहशतवादाच्या मुद्यावरून असलेले मतभेद यामुळे क्रिकेटचे आयोजन थांबले आहे.सुरक्षा हा महत्त्वाचा मुद्दा असल्याने पाकमध्ये ही स्पर्धा होऊ नये, असे दोन्ही देशांचे मत आहे. यावर पीसीबीचा एक अधिकारी म्हणाला, ‘दुबईत मागच्या आठवड्यात झालेल्या एसीसी बैठकीत भारत आणि बांगला देश बोर्डाने सुरक्षा कारणांमुळे पाकने यजमानपद स्वीकारू नये, अशी सूचना केली होती. पण आम्ही ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडू असा विश्वास देतो.’

टॅग्स :क्रिकेटभारतपाकिस्तानबीसीसीआय