Join us  

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर धोनी करणार 'ही' खास गोष्ट; मिळवणार पैसा, ग्लॅमर आणि बरंच काही

निवृत्तीनंतर धोनी करणार काय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण धोनीने मात्र या प्रश्नाचे उत्तर शोधले आहे. धोनीने निवृत्तीनंतर एका क्षेत्रात काम करायचे ठरवले आहे. या क्षेत्रातून त्याला बक्कळ पैसा तर मिळणार आहेत, पण त्याचबरोबर तो कायम ग्लॅमरमध्येही राहू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 6:19 PM

Open in App

नवी दिल्ली : भारताचा माजी विश्वविजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची वेळ आता जवळ आली असल्याचे म्हटले जात आहे. पण निवृत्तीनंतर धोनी करणार काय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण धोनीने मात्र या प्रश्नाचे उत्तर शोधले आहे. धोनीने निवृत्तीनंतर एका क्षेत्रात काम करायचे ठरवले आहे. या क्षेत्रातून त्याला बक्कळ पैसा तर मिळणार आहेत, पण त्याचबरोबर तो कायम ग्लॅमरमध्येही राहू शकतो.

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकात धोनीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती, असे म्हटले जाते. त्याचबरोबर या विश्वचषकानंतर धोनी निवृत्ती घेणार, अशी चर्चा होती. विश्वचषकानंतर धोनी भारतीय आर्मीबरोबर काश्मीरमध्ये सरावासाठी गेला होता. त्यानंतर धोनी आपल्या घरी परतला असून त्याने काही जाहीरातींचे शूटींगही केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत आपल्याला संधी मिळेल, अशी धोनीला आशा होता, पण तसे मात्र होताना दिसत नाहीए.

आता आपल्या निवृत्तीची वेळ जवळ आली आहे, हे धोनीलाही समजून चुकले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत धोनीला स्थान न मिळाल्यामुळे आता आपल्याला दुसऱ्या क्षेत्रात काम करावे लागणार, हे धोनीने ठरवले आहे. या क्षेत्रात धोनीला गुंतवणूक करावी लागणार आहे. त्याचबरोबर या क्षेत्रातील त्याचे मित्रही त्याला मदत करणार आहेत.

नीरज पांडेने काही वर्षांपूर्वी धोनीवर आधारीत सिनेमा बनवला होता. या सिनेमामुळे धोनीला बॉलीवूडच्या जवळ जाण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे आता या क्षेत्रामध्ये धोनी उतरणार आहे, असे म्हटले जात आहे, धोनी काही दिवसांमध्ये फिल्म निर्माता बनेलला तुम्हाला दिसला तर नवल वाटून घेऊ नका. कारण एका दिग्गज प्रोडक्शन ग्रुपबरोबर धोनीची चर्चा सुरु आहे. याबाबत धोनीने अधिकृतरीत्या काहीही सांगितलेले नाही.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी एका कार्यक्रमासाठी जयपूर येथे दाखल झाला. यावेळी धोनीची एक झलक पाहण्यासाठी जयपूर विमानतळावर चाहत्यांची झुंबड उडाली. धोनीचा फोटो काढण्यासाठी चाहत्यांमध्ये स्पर्धाच रंगली होती. पण, जयपूर विमानतळाबाहेर येताच धोनीच्या नव्या लूकने सर्वांना अचंबित केले. सोशल मीडियावर धोनीचा हा नवा लूक वाऱ्यासारखा व्हायरल झाला. या लूकमध्ये धोनी डोक्यावर काळा कपडा बांधलेला पाहयला मिळत आहे.

जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात पंधरा दिवस भारतीय सैन्यांसोबत पहारा देणारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी घरी परतला. नवी दिल्ली विमानतळावर त्याला भेटण्यासाठी पत्नी साक्षी आणि मुलगी जिवा हे उपस्थित होते. यावेळी आपल्या लाडक्या झिवाला धोनी बिलगल्याचे पाहायला मिळाले. एका बाजूला आर्मीमध्ये पहारासाठी गेलेला धोनी मात्र जिवा भेटला तेव्हा हळवा झाल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीबॉलिवूड