Join us

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहनं घातलं स्पेशल शर्ट, किंमत ऐकून चक्रावून जाल!

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमहार सध्या पाठिच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 11:08 IST

Open in App

नवी दिल्ली-

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमहार सध्या पाठिच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. बुमराह नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्येही खेळू शकला नाही आणि त्याची अनुपस्थितीत स्पष्टपणे जाणवली. बांगलादेश दौऱ्यातही बुमराहचा संघात समावेश झालेला नाही. यातच बुमराहनं नुकताच एक फोटो सोशल मीडिया हँडलवर पोस्ट केला आहे. 

बुमराहनं त्याचा फोटो शेअर करताना पंजाबी भाषेत कॅप्शन लिहिलं आहे. पण चाहत्यांचं लक्ष कॅप्शननं नव्हे, तर त्यानं परिधान केलेल्या शर्टनं वेधून घेतलं आहे जसप्रीत बुमराहनं या फोटोत जे शर्ट परिधान केलं आहे त्याची किंमत ऐकून तुम्हीही चक्रावून जाल. बुमराहनं घातलेलं शर्ट Balenciaga ब्रँडचं आहे आणि त्याची किंमत जवळपास १,१२,७६८ रुपये इतकी आहे. 

एका चाहत्यानं बुमराहच्या शर्टच्या फोटोचा स्क्रिनशॉट घेत त्याची ऑनलाइन किंमत किती आहे याची माहिती शेअर केली आहे. पण बुमराहकडून याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. शर्टच्या किमतीसोबतच चाहत्यांनी बुमराहला त्याच्या दुखापतीबाबतही विचारपूस केली आहे. 

"तुझा फिटनेस देखील तुझ्या कॅप्शनसारखाच आहे. कुणाला काही समजत नाही की तू केव्हा फिट होणार", असं एका यूझरनं म्हटलं आहे. तर एकानं बुमराह आयपीएलसाठी पूर्णपणे फिट होईल असं म्हटलं आहे. बुमराह जेव्हा ट्वेन्टी-२० वर्ल्डकप खेळू शकला नव्हता तेव्हाही त्याला आयपीएलवरुन ट्रोल केलं गेलं होतं. 

वेगवान गोलंदाज बुमराहचं यॉर्कर हे अस्त्र आहे. बडेबडे फलंदाज बुमराहच्या यॉर्करसमोर नांगी टाकतात. जसप्रीतनं आतापर्यंत ७२ वनडे सामन्यात २४.३० च्या सरासरीनं १२१ विकेट्स घेतल्या आहेत. तर ६० ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये २०.२२ च्या सरासरीनं ७० विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय ३० कसोटी सामन्यांमध्ये बुमराहच्या नावावर २१.९९ च्या सरासरीनं १२८ विकेट्सची नोंद आहे. 

टॅग्स :जसप्रित बुमराह
Open in App