Join us

विराटने हॉटेलमध्ये घेतली खास बैठक

सलग दुस-या कसोटीतील पराभवानंतर कर्णधार विराट कोहली याने संघाची बैठक हॉटेलमध्ये घेतली आहे. तसेच काही खेळाडूंची वैयक्तिक भेट घेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 03:50 IST

Open in App

सेंच्युरियन : सलग दुस-या कसोटीतील पराभवानंतर कर्णधार विराट कोहली याने संघाची बैठक हॉटेलमध्ये घेतली आहे. तसेच काही खेळाडूंची वैयक्तिक भेट घेत त्यांना वेगळेपणेदेखील समजावले. संघाच्या पराभवानंतर चिंतीत झालेल्या कर्णधाराने गुरुवारी हीबैठक घेतली.टीम इंडिया पराभवानंतर दु:खी आहे. गुरुवारी झालेल्या या बैठकीत संघाच्या कामगिरीवर कोहलीने खेळाडूंसोबत चर्चा केली. त्याने काही युवा खेळाडूंना टी २० आणि टेस्ट यांच्यातील फरक सांगितला. युवा खेळाडू हे टी २० खेळण्यात तरबेज आहेत. मात्र हेच काम ते कसोटीत करू शकत नाहीत.तीन कसोटी सामन्याच्या मालिकेतील दोन्ही पराभवानंतर संघात अजिंक्य रहाणेला जोहान्सबर्ग कसोटीत संधी मिळू शकते. फलंदाजीतील खराब कामगिरीनंतर भारतीय संघ नवीन रणनीती आखू शकतो.त्यासोबतच रहाणेला पुनरागमनाची संधीदेखील मिळू शकते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८विराट कोहली