Join us  

राजस्थानच्या युवा खेळाडूला कोहलीकडून स्पेशल गिफ्ट; ICC ने पोस्ट केला फोटो

राजस्थानने दिलेल्या १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोहलीने ५३ चेंडूंत ७२ धावांचा तडाखा देत आरसीबीला ८ विकेट्सने सहज विजय मिळवून दिला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2020 3:44 PM

Open in App

मुंबई : राजस्थान रॉयल्सविरुद्ध (Rajasthan Royals) झालेला सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोरसाठी (Royal Callengers Banglore) अत्यंत महत्त्वाचा ठरला. आरसीबीने या सामन्यात सहज बाजी मारलीच, पण त्यांच्यासाठी त्याहून अधिक महत्त्वाचे ठरले ते कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचे फॉर्ममध्ये येणे. या सामन्यानंतर कोहलीने राजस्थानच्या युवा खेळाडूला स्पेशल गिफ्ट देत त्याच्या खेळीचे कौतुक केले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (आयसीसी) या क्षणाचा फोटो ट्वीटरवर पोस्ट करुन ‘खेळच खेळाला ओळखतो’ अशी कमेंट केली आहे.

राजस्थानने दिलेल्या १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोहलीने ५३ चेंडूंत ७२ धावांचा तडाखा देत आरसीबीला ८ विकेट्सने सहज विजय मिळवून दिला होता. याआधीच्या सामन्यांत कोहली अपयशी ठरला होता. सामना संपल्यानंतर कोहलीने राजस्थानच्या युवा खेळाडूची भेट घेतली आणि त्याने केलेल्या धमाकेदार खेळीसाठी त्याला आपले ऑटोग्राफ केलेले टी-शर्ट भेट दिले. हा खेळाडू होता राहुल तेवटिया. (Rahul Tewatia)

किंग्ज ईलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात राहुलने एकाच षटकार ५ षटकारांचा पाऊस पाडताना राजस्थान रॉयल्सच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. राहुलच्या या खेळीने सर्वाचेच लक्ष वेधले होते. त्यामुळेच राजस्थानविरुद्धचा सामना संपल्यानंतर कोहलीने राहुलची भेट घेतली आणि त्याला स्वत:ची ऑटोग्राफ केलेली आरसीबीची जर्सी भेट दिली.

दोघांचाही टी-शर्टसोबतचा फोटो पोस्ट केला तो आयसीसीने. आयसीसीने या फोटोला कॅप्शन दिले की, ‘विराट कोहलीने राहुल तेवटियाला एक स्पेशल ऑटोग्राफ जर्सी भेट म्हणून दिली आहे. खेळच खेळाला ओळखतो.’ आयसीसीच्या या पोस्टवर क्रिकेटचाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला. 

टॅग्स :विराट कोहलीआयसीसीबीसीसीआयIPL 2020