Join us  

'MS Dhoni pavilion' रांचीतील क्रिकेट स्टेडियमवर झळकलं 'कॅप्टन कूल'चं नाव!

भारतीय क्रिकेटचा आयकॉन महेंद्रसिंग धोनीचा गौरव.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 8:51 AM

Open in App
ठळक मुद्देधोनीनं 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणआयसीसीच्या तीनही प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो पहिला कर्णधारआतापर्यंत त्याच्या या विक्रमाशी बरोबरी जमलेली नाही

रांची : मागील अनेक वर्ष भारतीय क्रिकेटचा आयकॉन म्हणून महेंद्रसिंग धोनी ओळखला जातो. भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांत मानाचे स्थान धोनीनं पटकावलं आहे. त्यानं अविश्वसनीय कामगिरी करून झारखंड राज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नकाशावर वेगळी ओळख दिली. त्याच्या या किर्तीचा गौरव म्हणून झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनने येथील स्टेडियममधील एका स्टॅण्डला कॅप्टन कून धोनीचं नाव देण्यात आले आहे. झारखंड क्रिकेट असोसिएशन स्टेडियममधील दक्षिण स्टॅण्ड आता 'MS Dhoni pavilion' म्हणून ओळखला जाणार आहे.

(  धोनीने केला बॅटमध्ये बदल आणि पडायला लागला धावांचा पाऊस

धोनीनं 2004 मध्ये बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण, त्याचा हा प्रवास सोपा नक्की नव्हता. अनेक अडचणींवर मात करत, संघर्ष करत धोनीनं भारतीय संघात स्वतःचं असं अढळ स्थान निर्माण केले. आजच्या घडीला रांचीचा हा सुपुत्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी खेळाडू आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकला आणि त्यानंतर धोनीतील नेतृत्वगुणाची सर्वांनी दखल घेतली.

( धोनीशिवाय कसं असेल क्रिकेटविश्व; ICC न केलं सुंदर काव्य!

भारतीय संघाच्या तीनही संघाचे कर्णधारपद धोनीकडे आले आणि 2011 मध्ये भारताने वन डे वर्ल्ड कप जिंकला. 1983 सालानंतर तब्बल 28 वर्षांनी भारताने वर्ल्ड कप जिंकला तो धोनीच्या नेतृत्वाखाली. त्याने भारताला जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवून दिले आणि आशिया चषक व चॅम्पियन्स ट्रॉफीही धोनीच्याच नेतृत्वाखाली भारताने उचलली. आयसीसीच्या तीनही प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो पहिला कर्णधार ठरला आणि आतापर्यंत एकाही कर्णधाराला त्याच्या या विक्रमाशी बरोबरी करता आलेली नाही.

( 'भारताला वर्ल्ड कप जिंकायचाय, तर महेंद्रसिंग धोनी संघात हवाच' )

त्याच्या याच अविश्वसनीय कामगिरीचा गौरव म्हणून झारखंड क्रिकेट असोसिएशनने स्टेडियममधील एका स्टॅण्ड धोनीचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वन डे सामना 8 मार्चला रांचीत होणार आहे आणि त्यावेळी ही घोषणा करण्यात येईल. धोनीला राज्य सरकारने झारखंड रत्न पुरस्कार देऊन आधीच गौरविले आहे. त्याला पद्म भुषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. धोनीनं कसोटीत 4876, वन डेत 10415 आणि ट्वेंटी-20 त 1548 धावा केल्या आहेत. जगातील सर्वोत्तम यष्टिरक्षक म्हणून धोनी अग्रेसर आहे. 

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीबीसीसीआयआयसीसी