South Africa Won Second ODI Match Against India Now IND vs SA ODI Series Level : एडन मार्करमच्या दमदार अर्धशतकानंतर बेबी एबीच्या बॅटमधून आलेले झंझावत अर्धशतक आणि मॅथ्यू ब्रीट्झकेच्या दमदार खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ३५० पार धावांची लढाई जिंकत भारतीय संघाला पराभवाचा धक्का दिला आहे. रायपूरचं मैदान मारत दक्षिण आफ्रिकेनं ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. परिणामी किंग कोहलीसह ऋतुराज गायकवाडची शतकी खेळी व्यर्थ ठरली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दक्षिण आफ्रिकेचा ऐतिहासिक विजय; भारतावर दुसऱ्यांदा ओढावली अशी नामुष्की
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ३५९ धावांचा यशस्वी पाठलाग करत नवा इतिहास रचला आहे. परदेशात याआधी कधीच त्यांनी ३५० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग केला नव्हता. रायपूरच्या मैदानात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत बरोबरीचा डाव साधताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ऑस्ट्रेलियाच्या रेकॉर्डशी बरोबरी केली. ३५० पेक्षा अधिक धावा केल्यावर भारतीय संघाने फक्त एकदाच सामना गमावला होता. २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियन संघाने मोहालीच्या मैदानात ३५९ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेच्या संघानं भारतीय संघाला धक्का दिला आहे.
पहिल्यांदा फलंदाजी करताना किंग कोहलीसह ऋतुराजच्या भात्यातून आले शतक
रायपूरच्या मैदानात रंगलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना विराट कोहली १०२ (९३) आणि ऋतुराज गायकवाडच्या १०५ (८३) शतकी खेळीसह लोकेश राहुलनं केलेल्या ६६ (४३) अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ३५८ धावा करत पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघासमोर ३५९ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉकच्या रुपात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा आणि एडन मार्करम जोडीनं संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. अर्शदीप सिंगनं अवघ्या ८ धावांवर त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
मार्करमनं आधी कर्णधारासह शतकी भागीदारी रचली, मग...
अवघ्या २६ धावांवर पहिली विकेट गमावल्यावर एडन मार्करम आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२७ धावांची दमदार भागीदारी केली. प्रसिद्ध कृष्णानं टेम्बा बावुमाला ४६ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. मार्करमनं आपली खेळी पुढे नेत शतक साजरे केले. मॅथ्यू ब्रीट्झकेच्या साथीनं त्याने ७० धावांची भागीदारी रचली. हर्षित राणानं मार्करमच्या खेळीला ब्रेक लावला. त्याने ९८ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ११० धावांची खेळी केली.
मार्करमच्या शतकी खेळीशिवाय या दोघांची अर्धशतके
मार्करमच्या शतकी खेळीनंतर डेवाल्ड ब्रेव्हिस याने ३४ चेंडूत १ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५४ धावांची दमदार खेळी केली. याशिवाय मॅथ्यू ब्रीट्झके याने ६४ चेंडूत ५ चौकाराच्या मदतीने ६८ धावांची खेळी केली. कुलदीपनं ब्रेविसचा अडथळा दूर केल्यावर प्रसिद्ध कृष्णानं मॅथ्यू मॅथ्यू ब्रीट्झके याला तंबूत धाडले. अर्शदीप सिंगनं पहिल्या वनडेत भारतीय गोलंदाजावर तुटून पडलेल्या मार्को यान्सेनची विकेट घेतल्यावर भारतीय संघ या सामन्यात कमबॅक करेल, असे वाटत होते. पण कॉर्बिन बॉश २९ (१५)* आणि केशव महाराज १० (१४) * दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या संघाला ४ विकेट्स आणि ४ गडी राखून विजय मिळवून दिला.