नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिका दौ-यातील भारतीय संघाच्या निराशाजनक कामगिरीची समीक्षा करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) संचालन करत असलेली प्रशासकीय समितीने (सीओए) घेतला आहे. भारताने पहिल्या दोन कसोटी सामन्यात पराभव पत्करून तीन सामन्यांची मालिका गमावली आहे. बुधवारपासून औपचारिकता राहिलेल्या तिसºया सामन्यास सुरुवात होईल.
मंगळवारी दिल्लीत झालेल्या ‘सीओए’ बैठकीमध्ये उपस्थिती ‘बीसीसीआय’च्या अधिकाºयांनी म्हटले, ‘संघव्यवस्थापकाकडून संपूर्ण अहवाल मिळाल्यानंतर आम्ही संघाच्या कामगिरीची समीक्षा करू. सध्या खेळाडू आणि अधिकारी दक्षिण आफ्रिकेत असल्याने काहीच करू शकत नाही.’ (वृत्तसंस्था)
या बैठकीमध्ये ‘सीओए’ प्रमुख विनोद राय, सदस्या डायना एडुल्जी आणि ‘बीसीसीआय’चे सीईओ राहुल जोहरी यांची उपस्थिती होती. त्याचवेळी, ‘बीसीसीआय’चे कार्यवाहक अध्यक्ष सी. के. खन्ना आणि कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी यांच्यासह इतर कोणत्याही अधिकाºयांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले नव्हते. (वृत्तसंस्था)