कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या सेमीफायनलमध्ये मार्को यान्सेनच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने न्यूझीलंडसमोर १७० धावांचे टार्गेट सेट केले आहे. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यावर मार्को यान्सेन याने ३० चेंडूत २ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५५ धावांची नाबाद खेळी साकारली. त्याने सहाव्या विकेटसाठी ट्रिस्टन स्टब्सच्या साथीनं ७३ धावांची भागीदारी रचली. ही टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील नॉकआउटमधील सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावरील दुसऱ्या क्रमांची सर्वोच्च भागीदारी आहे. या भागीदारीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात १६९ धावांपर्यंत मजल मारली.
मार्कोनं जलद अर्धशतकासह साधला खास डाव, युवीच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
मार्को यान्सेन याने या सामन्यात फक्त २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या नॉकआउटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकणारा तो पाचवा फलंदाज ठरला आहे. या यादीत भारताचा माजी दिग्गज युवराज सिंग अव्वलस्थानावर आहे. २००७ च्या हंगामात युवराज सिंगनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० च्या सेमीफायनलमध्ये २० चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
ICC टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या नॉकआउटमध्ये जलद अर्धशतक झळकवणारे फलंदाज
- २० चेंडू – युवराज सिंग (भारत) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२००७)
- २२ चेंडू – मायकल हसी (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध पाकिस्तान (२०१०)
- २३ चेंडू – हेन्रिक क्लासेन (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध भारत (२०२४)
- २६ चेंडू – जेसन रॉय (इंग्लंड) विरुद्ध न्यूझीलंड (२०१६)
- २७ चेंडू – मार्को यान्सेन (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध न्यूझीलंड (२०२६)न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिचेल सँटनर याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. रचिन रविंद्र, मॅट हेन्री आणि कोल मॅकोन्ची यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स आपल्या खात्यात जमा करत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला धक्क्यावर धक्के दिले. लॉकी फर्युसन आणि जेमी नीशम यांनी आपल्या खात्यात प्रत्येकी १-१ विकेट जमा केली. कर्णधाराची पाटी मात्र कोरीच राहिली. पण सँटनरनं ४ षटकात फक्त २५ धावा खर्च करत दक्षिण आफ्रिकेच्या धावगतीवर अंकुश लावण्याची भूमिका अगदी चोख बजावली.
Web Summary : Marco Jansen's blistering fifty propelled South Africa to 169 against New Zealand. His 55* off 30 balls, with valuable support from Tristan Stubbs, helped recover from an earlier collapse. Jansen's 27-ball half-century is the fifth fastest in T20 World Cup knockout history, joining Yuvraj Singh's record.
Web Summary : मार्को जेनसन के तूफानी अर्धशतक से दक्षिण अफ्रीका ने न्यूजीलैंड के खिलाफ 169 रन बनाए। ट्रिस्टन स्टब्स के सहयोग से उन्होंने 30 गेंदों में नाबाद 55 रन बनाए और टीम को शुरुआती झटकों से उबारा। जेनसन का 27 गेंदों में अर्धशतक टी20 विश्व कप नॉकआउट इतिहास का पांचवां सबसे तेज अर्धशतक है, जो युवराज सिंह के रिकॉर्ड में शामिल हो गया।