Join us

RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!

गत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील फायनलनंतर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 20:17 IST

Open in App

South Africa vs India 1st T20I : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना डरबनच्या मैदानात खेळवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याने या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. IPL मेगा लिलावाआधी भारतीय ताफ्यातील खेळाडूंसह दक्षिण आफ्रिकेच्या संघातील खेळाडूंसाठी आपला हिट शो दाखवण्यासाठी ही एक सर्वोत्तम संधी असेल.  

टॉसनंतर सूर्यानं  रोहित शर्माच्या अंदाजात दिला रिप्लाय 

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करून दाखवली आहे. दक्षिण आफ्रिके विरुद्ध त्याच्यासमोर कॅप्टन्सीचे एक नवे चॅलेंज असेल. यात तो यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल. सूर्यकुमार यादव हा नेतृत्वाच्या बाबतीत रोहित शर्माला कॉपी करतो. टॉसवेळीही त्याचे प्रतिबिंब पाहायला मिळते. दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकल्यावर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी सूर्यकुमार यादवनं अगदी रोहित शर्मा टॉस गमावल्यावर जशी प्रतिक्रिया  देतो अगदी तेच सूर्यानंही  केलं. टॉस जिंकलो असतो तर आम्ही बॅटिंगच करणार होतो, असे तो म्हणाला. त्यामुळे टॉस गमावला असला तरी जे टीम इंडियाला हवं तसेच झाले, असे त्याच्या प्रतिक्रियेवरून दिसून येते. 

पहिल्या टी-२० सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ

 अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेट किपर /बॅटर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, आवेश खान.

दक्षिण आफ्रिका संघाची प्लेइंग इलेव्हन  

रायन रिकेल्टन (विकेट किपर), एडन मार्करम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, पॅट्रिक क्रुगर, मार्को जॅनसेन, अँडिले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, न्काबायोमझी पीटर.