Join us
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण आफ्रिका दौरा खडतर : माजी व्यवस्थापक लालचंद राजपूत यांचं मत

‘विराट कोहली आणि त्याचा संघ सध्या प्रतिस्पर्धी संघांना लोळवण्याच्या निर्धाराने खेळत आहे. आगामी दक्षिण आफ्रिका दौ-यात अभूतपूर्व कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाला असाच खेळ करावा लागेल,’ असे मत भारतीय संघाचे माजी व्यवस्थापक लालचंदराजपूत यांनी व्यक्त केले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:56 IST

Open in App

मुंबई : ‘विराट कोहली आणि त्याचा संघ सध्या प्रतिस्पर्धी संघांना लोळवण्याच्या निर्धाराने खेळत आहे. आगामी दक्षिण आफ्रिका दौ-यात अभूतपूर्व कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाला असाच खेळ करावा लागेल,’ असे मत भारतीय संघाचे माजी व्यवस्थापक लालचंदराजपूत यांनी व्यक्त केले. ५ जानेवारीपासून सुरू होणाºया दक्षिण आफ्रिका दौºयात भारतीय संघ तीन कसोटी, ६ एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे. विशेष म्हणजे कर्णधार म्हणून विराट कोहलीपुढे हे सर्वांत खडतर आव्हान असेल.भारतीय संघाला अत्यंत मजबूत मानताना राजपूत यांनी म्हटले की, ‘ज्याप्रकारे भारतीय संघ क्रिकेट खेळत आहे, ते अत्यंत कठोर आहे. कर्णधार म्हणून विराट कोहली जी आक्रमकता दाखवत आहे, त्याचाच परिणाम संघातील खेळाडूंवरही झाला आहे. त्यामुळेच सध्याचे भारतीय खेळाडू कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकण्याचा निर्धार करत आहेत. प्रतिस्पर्धी संघांना उद्ध्वस्त करण्यास टीम इंडिया खेळत आहे.’ आगामी दक्षिण आफ्रिका दौºयाविषयी राजपूत यांनी म्हटले की, ‘सध्याच्या संघात चमत्कार करण्याची क्षमता आहे.

टॅग्स :क्रिकेटद. आफ्रिकाभारतीय क्रिकेट संघ