Join us

एबी डिव्हिलियर्सचा धक्कादायक खुलासा! माजी आयपीएल फ्रँचायझीवर मोठा आरोप

दक्षिण आफ्रिकेच्या महान फलंदाजांपैकी एक एबी डिव्हिलियर्सने ( South Africa legend AB de Villiers ) त्याच्या माजी आयपीएल फ्रँचायझीबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 17:22 IST

Open in App

दक्षिण आफ्रिकेच्या महान फलंदाजांपैकी एक एबी डिव्हिलियर्सने ( South Africa legend AB de Villiers ) त्याच्या माजी आयपीएल फ्रँचायझी दिल्ली डेअरडेव्हिल्स (आताची दिल्ली कॅपिटल्स) बद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. डिव्हिलियर्सने सांगितले की २०१० नंतर त्याला २०११ मध्ये संघात रिटेन केले जाईल म्हणजेच कायम ठेवण्यात येईल असे सांगण्यात आले होते, परंतु एक-दोन आठवड्यांनंतर त्याला करारमुक्त करण्याचा निर्णय घेतला गेला.  

माजी कर्णधार आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स हा इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक आहे. विराट कोहलीनंतर आरसीबीसाठी एबीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने २०११ ते २०२१ या कालावधीत आरसीबीसाठी ४५२२ धावा केल्या. यापूर्वी डिव्हिलियर्सने २००८ ते २०१० या कालावधीत दिल्लीकडून तीन हंगाम खेळली होती.  

दिल्ली फ्रँचायझीच्या व्यवस्थापनावर आरोपत्याच्या यूट्यूब चॅनेलवर एबी डिव्हिलियर्सने खुलासा केला की, २०१० च्या हंगामानंतर दिल्ली फ्रँचायझीच्या व्यवस्थापनाने त्याला बोलावले आणि २०११ च्या लिलावापूर्वी तुला संघात कायम ठेवण्यात येईल असे सांगितले. जेव्हा मी २०१० च्या मोसमात खेळलो तेव्हा मला ऑफिसमध्ये बोलावून सांगण्यात आले होते की तुला कायम ठेवण्यात येईल. त्या बैठकीत मी डेव्हिड वॉर्नरसोबत बसलो होतो. मात्र, एक-दोन आठवड्यांनंतर मला करारमुक्त केल्याचे समजले. हा माझ्यासाठी मोठा आश्चर्याचा धक्का होता.  

दरम्यान, दक्षिण आफ्रिका प्रीमिअर ट्वेंटी-२० लीगच्या दुसऱ्या पर्वाचा brand ambassador म्हणून एबी डिव्हिलियर्सच्या नावाची घोषणा केली आहे. आयपीएल २०११ च्या लिलावात आरसीबीने त्याची निवड केल्यावर त्याचे आयुष्य कायमचे बदलले असे त्याने उघड केले. एबी म्हणाला, मी माझ्या कारकिर्दीबद्दल अनिश्चित होतो. २०१० मध्ये मी फक्त पाचच सामने खेळले होते, त्यामुळे माझ्या मनात अनेक शंका निर्माण झाली होती. पण माझ्याकडे खूप चांगला आंतरराष्ट्रीय हंगाम होता. मी चांगले क्रिकेट खेळत राहिलो आणि सुदैवाने लिलाव झाला आणि मला आरसीबीने विकत घेतले. त्याने माझे आयुष्य कायमचे बदलले.

 

टॅग्स :एबी डिव्हिलियर्सआयपीएल २०२३दिल्ली कॅपिटल्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर