Join us

SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाचं शानदार शतक; वडिलांकडून पोराच्या खेळीला दाद!

temba bavuma: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने वेस्ट इंडिजविरूद्ध शानदार शतक झळकावले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 19:48 IST

Open in App

temba bavuma centuary । नवी दिल्ली : सध्या दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात कसोटी सामना खेळवला जात आहे. आफ्रिकन कर्णधार टेम्बा बवुमाने झळकावलेल्या शतकामुळे दक्षिण आफ्रिकेला 200 धावांच्या पुढे जाण्यास मदत झाली. यजमान दक्षिण आफ्रिकेने 73.2 षटकांपर्यंत 292 धावांची आघाडी घेतली आहे. तसेच कर्णधार टेम्बा बवुमा 217 चेंडूत 123 धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने एडन मार्करमच्या (96) धावांच्या खेळीच्या जोरावर 320 धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजला आपल्या पहिल्या डावात काही खास कामगिरी करता आली नाही. विडिंजचा संघ पहिल्या डावात केवळ 251 धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात यजमान दक्षिण आफ्रिकेने शानदार कामगिरी केली. कर्णधार बवुमा शतकी खेळीसह खेळपट्टीवर टिकून आहे, तर सिमरन हार्मर (10) धावा करून कर्णधाराची साथ देत आहे. 

टेम्बा बवुमाने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. 14 चौकारांच्या मदतीने बवुमाने 123 धावांची शतकी खेळी पूर्ण केली. आपल्या मुलाच्या खेळीचे कौतुक करण्यासाठी बवुमाच्या वडिलांनी देखील मैदानात हजेरी लावली, ज्याचा फोटो समोर आला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :द. आफ्रिकावेस्ट इंडिजआंतरराष्ट्रीय क्रिकेट
Open in App