Join us

CoronaVirus: द. आफ्रिकेचा श्रीलंका दौरा रद्द

तीन वन डे आणि तीन टी-२० सामने खेळण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात द. आफ्रिका संघ श्रीलंकेत जाणार होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 23:16 IST

Open in App

जोहान्सबर्ग : कोरोनामुळे द. आफ्रिकेने जून महिन्यात आयोजित श्रीलंका दौरा रद्द केला आहे. तीन वन डे आणि तीन टी-२० सामने खेळण्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात द. आफ्रिका संघ श्रीलंकेत जाणार होता.सीएसएचे सीईओ डॉ. जॅक फाऊल म्हणाले, ‘आमचा संघ लॉकडाऊनमुळे दौऱ्याची तयारी करू शकला नाही. याशिवाय खेळाडूंच्या आरोग्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. परिस्थितीनुरूप निर्णय घ्यावा लागला हे दुर्दैवी असून दौºयाच्या नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत.’खेळाडूंचा सराव आणि विश्वचषकाची तयारी यासाठी हा दौरा अतिशय महत्त्वपूर्ण होता.(वृत्तसंस्था)

टॅग्स :द. आफ्रिकाश्रीलंका