Join us
Daily Top 2Weekly Top 5

द. आफ्रिकेची यूएईवर सहा गड्यांनी मात; काेर्बिन बॉशचा भेदक मारा : ब्रेविस फॉर्ममध्ये परतला

हलका पाऊस आणि थंड वातावरणातही अरुण जेटली स्टेडियम येथे भारताचा सामना नसतानाही १२ हजारांहून अधिक प्रेक्षकांनी हा सामना पाहिला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 09:10 IST

Open in App

नवी दिल्ली : कोर्बिन बॉशच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध आणि प्रभावी कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने टी-२० विश्वचषकातील अखेरच्या  गट सामन्यात बुधवारी संयुक्त अरब अमिरातीवर सहा गडी राखून विजय मिळवला. गत उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेचा सुपर आठ टप्प्यांतील पहिला सामना २२ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे चॅम्पियन भारताविरुद्ध होणार आहे. दरम्यान, यूएई संघाने या पराभवासह स्पर्धेतून निरोप घेतला.

हलका पाऊस आणि थंड वातावरणातही अरुण जेटली स्टेडियम येथे भारताचा सामना नसतानाही १२ हजारांहून अधिक प्रेक्षकांनी हा सामना पाहिला. प्रथम गोलंदाजी करताना बॉशच्या तीन विकेट्सच्या जोरावर यूएईला ६ बाद १२२ धावांवर रोखल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने १३.२ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले. महत्त्वाचे म्हणजे, डेवाल्ड ब्रेविस याने २५ चेंडूंत एक चौकार व ३ षटकारांसह ३६ धावांची खेळी करीत फॉर्ममध्ये  परतल्याचे संकेत दिले.

कर्णधार एडेन मार्करमने ११ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकारासह २८ तर रिकेल्टनने १६ चेंडूंत ३० धावा केल्या.  याआधी, यूएईच्या डावात दहा चौकार आणि दोन षटकार लागले. अलिशान शराफू (३८ चेंडूंत ४५ धावा) याला वगळता अन्य कोणालाही मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार मुहम्मद वसीम (२२) चांगली सुरूवात करून तंबूमध्ये परतला.

  संक्षिप्त धावफलक

यूएई : २० षटकांत ६ बाद १२२ धावा  (अलिशान शराफू ४५, मोहम्मद वसीम २२, आर्यांश शर्मा १३; कार्बिन बॉश ३/१२, नॉर्खिया २/२८.) पराभूत वि. दक्षिण आफ्रिका : १३.२ षटकांत ४ बाद १२३ धावा (डेवाल्ड ब्रेविस ३६, रेयान रिकेल्टन ३०, एडेन मार्करम २८; अरफान १/१६, फारुख १/१९, जवादुल्लाह १/२०, हैदर अली १/३३.)

English
हिंदी सारांश
Web Title : South Africa Dominates UAE by Six Wickets; Bosch Shines

Web Summary : South Africa defeated UAE in the T20 World Cup, winning by six wickets. Corbin Bosch's bowling and Dewald Brevis's return to form were key. South Africa will face India in the Super Eight stage.
टॅग्स :ऑफ द फिल्डद. आफ्रिका