Join us

विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, डू प्लेसिसकडे नेतृत्व

इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेने आपल्या संघाची घोषणा आज केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 22:56 IST

Open in App

जोहान्सबर्ग -  इंग्लंडमध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेने आपल्या संघाची घोषणा आज केली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व फॅफ डू प्लेसिसकडे सोपवण्यात आले असून, संघामध्ये हाशिम अमला आणि डेल स्टेन या अनुभवी खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या 15 सदस्यीस संघामध्ये एंडिल फेहलुकवायो आणि ड्वेन प्रेटोरियार या दोन अष्टपैलूंना स्थान देण्यात आळे आहे. तसेच दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज एन्रिक नोर्त्जे यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. त्याशिवाया एडिन मार्कराम यालाही संघात स्थान देण्यात आले आहे. जे.पी. ड्युमिना आणि डेव्हिड मिलर यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल. दक्षिण आफ्रिकेच्या यष्टीरक्षणाची धुरा क्विंटन डी कॉक याच्याकडे असेल. तर फिरकीची धुरा इम्रान ताहीरकडे असेल.दक्षिण आफ्रिकेचा संघ फॅफ डू प्लेसिस (कर्णधार),  जे.पी. ड्युमिनी, डेव्हिड मीलर, डेल स्टेन, एंडिल फेहलुकवायो, इम्रान ताहीर, कागिसो रबाडा, ड्वेन प्रेटोरियस, क्विंटन डीकाँक (यष्टीरक्षक) एन्रिक नोर्त्जे, लुंगी एन्डिंगी, एडेन मार्कराम, रॉसी वॅन डर डुस्सेन, हाशिम अमला आणि तबरेज शम्सी.   

टॅग्स :द. आफ्रिकावर्ल्ड कप २०१९