Join us  

सौरव गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला; आता पुढे काय?

माजी कर्णधार सौरव गांगुली याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदाचा कार्यकाळ रविवारी ( 26 जुलै) संपला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 10:57 AM

Open in App

माजी कर्णधार सौरव गांगुली याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदाचा कार्यकाळ रविवारी ( 26 जुलै) संपला आहे. कुलिंग-ऑफ पीरेडच्या नियमांचं पालक करताना भारतीय क्रिकेट प्रशासनातील त्याचा 6 वर्षांचा कार्यकाल समाप्त झाला आहे. बीसीसीआयच्या संविधानानुसार भारतीय क्रिकेट प्रशासनावर पुन्हा सक्रिय होण्यासाठी त्याला तीन वर्षांचा ब्रेक घ्यावा लागणआर आहे. त्यानंतर तो राज्य क्रिकेट संघटनेच्या किंवा बीसीसीआयच्या प्रशासकाची जबाबदारी स्वीकारू शकतो. पण, या काळा तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर जाऊ शकतो, परंतु त्यासाठी त्याला बीसीसीआयची परवानगी आणि अन्य राष्ट्रीय क्रिकेट मंडळांचा पाठींबा मिळणे गरजेचे आहे.

Fact Check : IPL 2020चं वेळापत्रक जाहीर? जाणून घ्या व्हायरल झालेल्या PDFचं सत्य

गांगुलीचा कार्यकाळ संपला असला म्हणून तो या पदावरून पायऊतार होईल, असं नाही. कुलिंग-ऑफ नियमात बदल करण्यासाठी बीसीसीआयनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याची सुनावणी 17 ऑगस्टला होणार आहे. तोपर्यंत गांगुली आणि अन्य सदस्य आपापल्या पदावर कायम राहणार आहेत. जय शाह सचिवपदी कायम राहणार आहे. त्यांचा कार्यकाळ मे महिन्यात संपुष्टात आला आहे, तर संयुक्त सचिव जयेश जॉर्ज यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये संपणार आहे. गांगुलीनं 27 जुलै 2014मध्ये बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिवपद सांभाळले होते. त्यानंतर 2015मध्ये त्यानं बंगाल क्रिकेट असोसिएशनचं अध्यक्षपदही भूषविले आणि ऑक्टोबर 2019मध्ये तो बीसीसीआय अध्यक्ष झाला. 

दरम्यान, गांगुलीनं 2023च्या वर्ल्ड कप पर्यंत बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर रहावं, अशी इच्छा महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केली आहे. ''सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सध्या भारतीय क्रिकेट  विचीत्र अवस्थेत सापडलं आहे. सौरव गांगुलीनं 2023 पर्यंत बीसीसीआयच्या अध्यक्षपदी कायम रहावं ही माझी इच्छा आहे.  सौरवने आपल्या कर्णधारपदाच्या काळात भारतीय संघाला सर्वोच्च स्थानावर नेवून ठेवलं आणि त्याचपद्धतीने बीसीसीआयच्या कारभारातही त्याच्या अनुभवाची गरज आहे.'' असे गावस्कर म्हणाले.  

IPL 2020 : विराट कोहलीची चिंता वाढवणारी बातमी; MS Dhoni, Rohit Sharma यांनाही टेंशन!

IPL 2020 मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची रोज कोरोना टेस्ट करा; फ्रँचायझी मालकाची मागणी

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआय