Join us  

सौरव गांगुलीला बुधवारी मिळणार डिस्चार्ज; प्रकृती ठिक, परंतु आणखी एका अँजिओप्लास्टीची गरज

प्रसिद्ध सर्जन डॉ. देवी शेट्टी यांनी मंगळवारी हॉस्पिटलमध्ये जाऊन गांगुलीच्या प्रकृतीची पाहणी केली.

By स्वदेश घाणेकर | Published: January 05, 2021 1:53 PM

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याला कोलकाताच्या बूडलँड हॉस्पिटलमधून बुधवारी  डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. यावेळी त्यांनी गांगुलीच्या प्रकृतीबाबतही अपडेट्स दिले. छातीत दुखू लागल्यामुळे शनिवारी गांगुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आता त्याची प्रकृती सुधारली असून त्याला डिस्चार्ज दिला जाईल. त्याच्यावर घरीच उपचार सुरू राहतील, असे डॉक्टरांनी सांगितले.  

प्रसिद्ध सर्जन डॉ. देवी शेट्टी यांनी मंगळवारी हॉस्पिटलमध्ये जाऊन गांगुलीच्या प्रकृतीची पाहणी केली. अनेक भारतीयांमध्ये हृदयासंदर्भात आढळणारा आजार गांगुलीला झाला आहे. पण, त्यामुळे त्याच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही. त्याच्यावर नित्यक्रमानं अँजिओप्लास्टीची गरज आहे आणि औषध व काळजी घेतल्यानंतर तो पुन्हा पूर्वीसारखा कामकाज करू शकतो. पुढील दोन आठवड्यात त्याच्यावर पुढील उपचार करण्यात येतील, असे  शेट्टी यांनी सांगितले.   गांगुलीवर उपचार करण्यासाठी १३ वैद्यकिय सदस्यांची टीम काम करत होती. गांगुलीची अँजिओप्लास्टी करण्यात आली. 

क्रिटिकल हेत ब्लॉकेज -बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची प्रकृती आता स्थिर आहे. वुडलँड्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर आफताब खान यांनी सांगितले, की सौरव गांगुली यांची अँजिओप्लास्टी झाली आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्यावर पुढील 24 तास लक्ष ठेवण्यात येईल. तो पूर्णपणे शुद्धीवर आहे. त्यांच्या हृदयात दोन ब्लॉकेज होते. वुडलँड्स रुग्णालयाच्या सीईओ डॉ. रूपाली बसू आणि डॉ. सरोज मंडल यांनी सांगितले, की त्यांच्या हृदयात अनेक ब्लॉकेज होते. जे 'क्रिटिकल' होते. त्यांना स्टेंट लावण्यात आले आहे.

टॅग्स :सौरभ गांगुलीबीसीसीआय