Join us  

सौरव गांगुली Vs जय शाह; BCCIच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी रंगणार सामना 

BCCIच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. इंडियन प्रीमिअर लीगचे ( Indian Premier League) १३वे पर्व यूएईत यशस्वीपणे पार पाडल्यानंतर २०२१च्या आयपीएलच्या हालचालींना वेग आला.

By स्वदेश घाणेकर | Published: December 23, 2020 12:48 PM

Open in App

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( BCCI) ची ८९वी वार्षिक सर्वसाधारण संभा गुरुवारी ( २४ डिसेंबर) पार पडणार आहे. इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL) पुढील मोसमात दोन नवीन संघांचा समावेश हा या बैठकीतील महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. पण, या सामन्यापूर्वी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) विरुद्ध सचिव जय शाह ( Jay Shah) यांच्यात मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना खेळवला जाणार आहे.  

अहमदाबाद येथे नव्यानं उभारण्यात आलेल्या मोटेरा स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या बैठकीसाठी बहुतेक सर्व सदस्य मंगळवारी दाखल झाले आहेत. मैत्रीपूर्ण सामन्यातील एका संघाचे नेतृत्त गांगुली करणार, तर दुसरा सामन्याचे नेतृत्व जय शाह यांच्याकडे असणार आहे. MID DAYनं दिलेल्या वृत्तानुसार गांगुलीशिवाय भारताचा माजी कर्णधार आणि सध्या हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहम्मद अझरुद्दीन, माजी फलंदाज ब्रिजेश पटेल ( कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष) हेही खेळणार आहेत. जय शाह हे सौराष्ट्र संघाचे माजी कर्णधार आहेत.

अदानी, गोएंका शर्यतीत, BCCI दोन नव्या IPL टीमना मान्यता देणार! 

आयपीएलच्या १३व्या पर्वात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला ( CSK) अपयशाचे तोंड पाहावे लागले. त्याचबरोबर अन्य संघांनाही मोठे धक्के बसले. त्यामुळे २०२१साठी नव्यानं लिलाव ( Auction) होण्याचीही चर्चा सुरू होती. तसेच पुढील वर्षी दोन नवीन संघही मैदानावर उतरणार असल्याची चर्चा आहे. 

आयपीएलमध्ये दोन नव्या संघांसाठी अदानी ग्रुप आणि गोएंका हे शर्यतीत आहेत. अदानी ग्रुप व संजिव गोएंका ग्रुप आयपीएलचा नवा संघ खरेदी करण्यासाठी उत्सुक आहेत. यापैकी एक संघ हा अहमदाबादचा असेल आणि तो अदानी ग्रुप खरेदी करण्याची शक्यता अधिक आहे. दुसऱ्या संघासाठी कानपूर, लखनौ आणि पुणे यांच्या नावाची चर्चा आहे. संजिव गोएंका ग्रुपनं 2016 व 2017 च्या आयपीएलमध्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघ मैदानावर उतरवला होता आणि त्या संघाला अनुक्रमे सातव्या व दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. InsideSport ने दिलेल्या वृत्तानुसार या बैठकीत बीसीसीआय दोन नव्या संघांना मान्यता देण्याच्या तयारीत आहे. पण, २०२२च्या आयपीएलमध्ये १० संघ खेळतील. २०२१ची आयपीएल आहे त्याच ८ संघांमध्ये होणार आहे.

१० संघांचा समावेश म्हणजे होम-अवे असे एकूण ९४ सामने होतील आणि त्यामुळे स्पर्धेचा कालावधीही वाढेल.  तसेच पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी मिनी ऑक्शन फेब्रुवारीत होणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :बीसीसीआयसौरभ गांगुलीजय शाह