Join us

सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत महत्वाचे अपडेट्स; जय शाह, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेकांच्या प्रार्थना

जीममध्ये कसरत करताना त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले

By स्वदेश घाणेकर | Updated: January 2, 2021 16:00 IST

Open in App

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCIचा अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly)  याला छातीत दुखू लागल्यानं शनिवारी तातडीनं कोलकाता येथील वूडलँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. आज सांयकाळी त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार असल्याचे, नजिकच्या व्यक्तीनं सांगितलं. गांगुलीच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. BCCI सचिव जय शाह, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेकांनी ट्विट करून प्रार्थना करणारे ट्विट केलं आहे.सूत्रांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार गांगुलीच्या छातीत कळा आल्या आणि त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. आज त्याच्यावर कदाचित अँजिओप्लास्टी केली जाईल. त्याची प्रकृती आता ठिक आहे. तो आऊट ऑफ डेंजर आहे. गांगुलीनं बुधवारी इडन गार्डनला भेट दिली आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठीच्या तयारीची माहिती घेतली. सौरव गांगुली यांची प्रकृती स्थिर; प्रायमरी एँजिओप्लास्टी सुरू असल्याची माहिती वूडलँड्सच्या सीईओ डॉ. रुपाली बसूंनी दिली.

टॅग्स :सौरभ गांगुलीजय शाहममता बॅनर्जीबीसीसीआयविरेंद्र सेहवागअजिंक्य रहाणे