NZ vs BAN 2nd ODI (Marathi News) - बांगलादेशचा सलामीवीर सौम्या सरकारने ( Soumya Sarkar ) न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा १४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. सौम्याने १५१ चेंडूंत १६९ धावांची विक्रमी खेळी केली. १११.९२च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा केल्या. त्याच्या या खेळीत २२ चौकार व २ षटकारासह अवघ्या २४ चेंडूंत शंभर धावा होत्या.
३० वर्षीय सौम्याने न्यूझीलंडविरुद्धच्या या खेळीने सचिनचा मोठा विक्रम मोडला. न्यूझीलंडमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणाऱ्या आशियाई फलंदाजाचा विक्रम सौम्या सरकारच्या नावावर नोंदवला गेला आहे. २००९मध्ये मास्टर ब्लास्टरने ख्राईस्टचर्च येथे १६३ धावांची नाबाद खेळी केली होती.
वन डे क्रिकेटमध्ये परदेशात
बांगलादेशकडून ही सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. सौम्याच्या १६९ धावांच्या जोरावर बांगलादेशने २९१ धावा करता आल्या. यष्टिरक्षक मुश्फीकर रहिमने ५७ चेंडूंत ४५ धावा केल्या. पण, न्यूझीलंडने ४६.२ षटकांत ३ फलंदाज गमावून हे लक्ष्य पार केले. विल यंगने ९४ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारासह ८९ धावा केल्या. रचीन रविंद्रनेही ३३ चेंडूंत ४५ धावा केल्या. हेन्री निकोल्सनेही ९९ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ९५ धावांची खेळी केली. कर्णधार टॉम लॅथम ( ३४) व टॉल ब्लंडल ( २४) यांनी सामना संपवला.