Join us

कधी कधी हताश होतो, निराश होतो, पण मी...

प्रत्येकाच्या आयुष्यात काही वाईट दिवस असतात जे आपल्याला काही प्रमाणात कमजोर करण्यास कारणीभूत ठरतात. पण, आपण यामुळे चिंतित होता कामा नये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 09:57 IST

Open in App

अपयशापासून धडा घेऊन पुढे जातो. मी कधीही तणावात खेळत नाही. माझा हा दृष्टिकोन लोकांना ठाऊक आहे. पराभवानंतर तणावात खेळलो तर माझे वैयक्तिक आणि संघाचेही नुकसान होते. त्यामुळे मी डगमगत नाही. आयुष्यात आपण नेहमी काहीतरी शिकत पुढे गेले पाहिजे. हे करताना एकदा झालेली चूक दुसऱ्यांदा होणार नाही, याची कटाक्षाने काळजीही घेता आली पाहिजे.

प्रत्येकाच्या आयुष्यात काही वाईट दिवस असतात जे आपल्याला काही प्रमाणात कमजोर करण्यास कारणीभूत ठरतात. पण, आपण यामुळे चिंतित होता कामा नये. कारण पिक्चर अभी बाकी है. आपल्या आयुष्यात चांगले दिवसही येतील, हा विश्वास ठेवला पाहिजे आणि भावनांवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे. मलापण राग येतो. मीदेखील कधी-कधी हताश होतो. निराश होतो. पण, वर्तमानात जगत असताना मला या क्षणाला काय करायचे आहे याचा विचार करून मी कृतीला महत्त्व देतो. तेव्हा माझ्या भावनांवर नियंत्रण मिळवितो. 

आपल्याला आपल्या मनाला नियंत्रित करता आले तर आयुष्यात अनेक लक्ष्य उत्कृष्टपणे साध्य करता येतात. आपला मेंदू हा सर्वांत शक्तिशाली आहे. जो आपल्याकडून विचार आणि कृती करवून घेतो. म्हणून त्यावर नियंत्रण महत्त्वाचे आहे.

चूक मान्य करायश तुम्हाला सांगते की तुम्ही आयुष्यात विनम्र असले पाहिजे. आपण चूक करणार नाही तर आपण भगवान होऊ. जेव्हा आपल्याकडून एखादी चूक होईल तेव्हा जाहीरपणे उभे राहून आपल्याला ती मान्य करता आली पाहिजे, की ‘होय मी चुकलो!’

हे लक्षात घ्याnतुमच्या आयुष्यात कोणतेही स्वप्न नसेल तर तुम्ही प्रगती करू शकत नाही. स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वप्न पाहणेही आवश्यक आहे.nजेव्हा आपले ध्येय्य मोठे असते, तेव्हा समर्पणही मोठेच असावे लागते. आपल्या जबाबदारीला स्वीकारणे महत्त्वाचे आहे.nआयुष्यातील वाईट काळाला दोष देऊ नका, हाच काळ आयुष्याला रंजक बनवितो. नेहमी जिंकतच गेलात तर कमजोरी काय आहे हे कळणार नाही.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनी