Join us

IPL Virat Kohli : काही संघांचा माझ्या क्षमतेवर विश्वास नव्हता - विराट कोहली 

आरसीबीवरील निष्ठा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 07:43 IST

Open in App

मुंबई : ‘अनेक फ्रेंचाईजींना मला स्वत:कडे घेण्याची संधी होती. पण, कारकीर्दीच्या सुरुवातीला कोणीही मला पाठिंबा दिला नाही. किंबहुना माझ्या क्षमतेवर त्यांनी विश्वास ठेवला नाही. ‘आरसीबी’ने मात्र सुरुवातीपासून मला भक्कम पाठिंबा दिला,’ असे २००८ आयपीएल सुरू झाल्यापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाचा भाग असलेला स्टार फलंदाज विराट कोहलीने सांगितले.

आयपीएलमध्ये १५ पर्व एकाच संघाकडून खेळणारा विराट एकमेव खेळाडू आहे. एका शोमध्ये विराट म्हणाला, ‘सुरुवातीच्या तीन वर्षांमध्ये आरसीबीने  माझ्यावर विश्वास ठेवला. ही गोष्ट माझ्यासाठी विशेष आहे. अनेक संघांकडे मला खरेदी करण्याची संधी होती, मात्र, त्यांचा माझ्यावर आणि माझ्या कर्तृत्वावर विश्वास नव्हता. सुरुवातीला दिल्ली डेअरडेव्हिल्सने (आताचा दिल्ली कॅपिटल्स) १९ वर्षांखालील विश्वविजेता कर्णधार आणि स्थानिक खेळाडू असूनही मला निवडण्याची तसदी घेतली नाही.’ 

टॅग्स :विराट कोहलीआयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App