Join us  

Mumbai indians, IPL 2022: Suryakumar Yadav, Lasith Malinga अन् Jasprit Bumrah मध्ये रंगला हास्यकल्लोळ! पाहा काय रंगल्या गप्पा

जसप्रीत बुमराहने केली धमाल मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 7:24 PM

Open in App

Mumbai Indians, IPL 2022: मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या सामन्यात मोक्याच्या क्षणी पराभूत झाला. १५व्या षटकापर्यंत सामना हातात असताना गोलंदाजांनी हाराकिरी केली. अक्षर पटेल आणि ललित यादव या सहाव्या-सातव्या नंबरच्या फलंदाजांनी मुंबईला पराभवाची धूळ चारली. या सामन्यानंतर आता मुंबईचा दुसरा सामना शनिवारी राजस्थान ऱॉयल्ससोबत आहे. अनेक वर्षे मुंबईत असलेला लसिथ मलिंगा (Lasith Malinga) राजस्थानच्या संघाचा कोच झाला. त्यामुळे सामन्याआधी सराव सत्रादरम्यान सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) त्याच्यासोबत थोडीशी धमाल मस्ती केली.

मुंबई आणि राजस्थानचा संघ सरावासाठी मैदानावर एकत्र उतरला. राजस्थानचा फास्ट बॉलिंग कोच लसिथ मलिंगा मैदानात होता. बुमराह आणि मलिंगा एकमेकांशी संवाद साधत होते. त्यावेळी सूर्यकुमार यादव मागून हळूच दबक्या पावलाने आला आणि त्याने मलिंगाचे डोळे झाकले. ओळखा पाहू मी कोण.... असा मजेशीर प्रश्न त्याने विचारला. त्यावेळी मलिंगाने लगेच सूर्याला आवाजावरून ओळखलं. मुंबई इंडियन्सने हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. तसेच, तिघेही एकत्र येताच सूर्याने मलिंगाकडे बोल्टचा विषय काढला. दोन वर्षे मुंबईकडून खेळणारा ट्रेंट बोल्ट मलिंगाकडून खूप काही शिकलाय असं सूर्या म्हणाला. त्यावर बुमराहने गप्पांमध्ये सहभाग घेत, बोल्ट आता सहाच्या सहा चेंडू यॉर्कर टाकतो, असं मजेशीर वाक्य म्हटलं. त्यानंतर या तिघांमध्ये बराच हास्यकल्लोळ पाहायला मिळाला. पाहा तो व्हिडीओ-

मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी खुशखबर

मुंबई इंडियन्सकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सूर्यकुमार यादव त्याचा क्वारंटाईन संपवून बाहेर आला आहे. त्याने त्याचे सहकारी किरॉन पोलार्ड, इशान किशन आणि जसप्रीत बुमराह यांच्यासह सराव सत्रात भाग घेतला. त्याच्या उपस्थितीने संघ उत्साहित झाला आहे. दिल्ली विरुद्धच्या सामन्यात सूर्या संघासोबत नसताना अनमोलप्रीत सिंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेण्यात आले होते. त्याच्या जागी सूर्या संघात परतणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२जसप्रित बुमराहसूर्यकुमार अशोक यादवलसिथ मलिंगा
Open in App