Join us

Social Viral : असा गोलंदाज उभ्या आयुष्यात पाहिला नसेल, खदखदून हसायचंय तर 'Video' पाहाच

क्रिकेटमध्ये कधी काय घडेल, याचा अंदाज बांधणे फार कठीण आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 14:33 IST

Open in App

क्रिकेटमध्ये कधी काय घडेल, याचा अंदाज बांधणे फार कठीण आहे. त्यामुळे समोर सुरू असलेला सामना हा अमुक एक संघ जिंकेल, असे वाटत असताना अचानक प्रतिस्पर्धी पुनरागमन कधी करून जातात, याचा नेम नाही. त्यामुळे क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातं. इथे शेवटच्या क्षणापर्यंत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. त्यामुळेच हा खेळ जगभरात लोकांच्या पसंतीचा आहे. पण, याच रोमांचक, थरारर अनुभवांपलीकडे क्रिकेटमध्ये बरेच Funny प्रकारही अनुभवायला मिळाले आहेत. पण, आज जो Funny प्रकार आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, तो उभ्या आयुष्यात तुम्ही पाहिला नसेल. तुम्हाला खदखदून हसायचंय तर Video पाहाच...

व्हिडीओत एक क्रिकेट सामना पाहायला मिळेत. त्यात काही मुलं घरात क्रिकेट खेळत आहेत. एक व्यक्ती दरवाजाच्या आडून गोलंदाजी करताना दिसते आणि त्या व्यक्तीबरोबर नंतर काय घडतं हे पाहण्यासारखं आहे. गोलंदाजी करणारी ही व्यक्ती चेंडू टाकल्यानंतर नॉन स्ट्रायकर एंडला थांबतच नाही. ती थेट स्ट्रायकर फलंदाजाच्या इथे येऊन यष्टिंवर आदळते. 

पाहा व्हिडीओ...

 

टॅग्स :सोशल व्हायरल