Join us  

‘त्यामुळे’ पत्करतो जास्त धोका - केदार

विविध पद्धतींनी फटके खेळण्याच्या क्षमतेमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना जोखीम पत्करू शकलो

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 4:28 AM

Open in App

हैदराबाद : विविध पद्धतींनी फटके खेळण्याच्या क्षमतेमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना जोखीम पत्करू शकलो आणि दुसऱ्या एंडकडून महेंद्रसिंह धोनीच्या उपस्थितीने प्रतिस्पर्धी संघांवर दबाव ठेवता आल्याचे मत भारतीय संघाच्या पहिल्या लढतीतील विजयाचा शिल्पकार ठरणाऱ्या केदार जाधव याने व्यक्त केले आहे.केदार जाधवने ८७ चेंडूत नाबाद ८१ धावांची खेळी केली. या बळावर भारताने आॅस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव केला. धोनीने नाबाद ५९ धावा केल्या. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर केदार जाधव जास्त आक्रमक खेळला, तर धोनी पायातील सांधे आखडल्यामुळे संघर्ष करताना दिसला. धोनी फलंदाजी करताना संघर्ष करताना पाहून जास्त आक्रमक फटके खेळण्याचा निर्णय घेतला का, असा केदारला प्रश्न विचारला असता तो म्हणाला, ‘तसे नाही. आमच्यातील कोणा एकाला धोका पत्करावा लागणारच होता.मी माझ्या पूर्ण कारकिर्दीदरम्यान चौथ्या क्रमांकावर खेळत आहे. त्यामुळे मी सर्वच प्रकारचे फटके खेळण्यास सज्ज असतो. मी मोठा होत असताना नेहमीच आपल्या फलंदाजीत वेगवेगळे फटके खेळण्यासाठी स्वत:ला तयार केले. त्यामुळे माझ्याजवळ वेगळ्या पद्धतीचे फटके खेळण्याची संधी जास्त असते.’ धोनी सरळ फटके खेळतो. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघावर दबाव बनतो.जाधव म्हणाला, ‘धोनीचा नैसर्गिक खेळ हा सरळ फटकेखेळणे आहे. तो जोपर्यंत खेळपट्टीवर असतो तोपर्यंत प्रतिस्पर्धी संघ दबावात असतो. त्याला पायाच्या सांधे आखडण्याची समस्याहोती आणि मी त्याला तुम्ही खेळपट्टीवर असल्याने माझ्यात आत्मविश्वास उंचावतो, असे सांगितले. दुसºया बाजूला धोनी असल्यामुळेच मी माझा नैसर्गिक खेळ करू शकलो.’ धोनीकडून खूप काही शिकत असल्याचेही जाधव म्हणाला. केदार म्हणाला, ‘मी जेव्हा त्याच्यासोबत असतो तेव्हा खूप काही शिकतो. मी याचे वर्णन शब्दात करू शकत नाही. मी त्यांना पाहतो तेव्हा स्वत:ला खूप आश्वस्ताची जाणीव होती. त्याच्याकडे प्रत्येक खेळाडूकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याची क्षमता आहे आणि त्याची ही बाबच सर्वांना आवडते. धोनी आणि विराट यांनी त्यांच्या कारकिर्दीत जे काही प्राप्त केले त्याचे पूर्ण श्रेय त्यांना जाते.’>मी आतापर्यंत तरी सामन्यात पूर्ण १० षटके गोलंदाजी करण्याविषयी विचार केलेला नाही. जर परिस्थिती आणि संघाची आवश्यकता असेल, तर निश्चितच मी असे करू शकतो; परंतु असे सातत्याने करण्यासाठी मानसिक अथवा शारीरिक समन्वयाचीदेखील आवश्यकता असते. - केदार जाधव

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघकेदार जाधव