Mumbai Indians च्या ताफ्यात गडबड? मार्क बाऊचर यांच्या मुलाखतीवर रोहितची पत्नी नाराज

Mumbai Indians चा संघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि त्यामागचं कारण अर्थात रोहित शर्मा आहे..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 01:07 PM2024-02-06T13:07:04+5:302024-02-06T13:07:37+5:30

whatsapp join usJoin us
so many things wrong with this! Ritika Sajdeh's comment on Mark Boucher's interview talking about Hardik Pandya taking over MI captaincy | Mumbai Indians च्या ताफ्यात गडबड? मार्क बाऊचर यांच्या मुलाखतीवर रोहितची पत्नी नाराज

Mumbai Indians च्या ताफ्यात गडबड? मार्क बाऊचर यांच्या मुलाखतीवर रोहितची पत्नी नाराज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Mumbai Indians चा संघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि त्यामागचं कारण अर्थात रोहित शर्मा आहे.. Rohit Sharma इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार नाही. २०१३ नंतर प्रथमच रोहित या फ्रँचायझीसोबत कर्णधार म्हणून नाही, तर खेळाडू म्हणून खेळणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने सर्वाधिक ५ जेतेपदं जिंकली. पण, हार्दिक पांड्याचे ( Hardik Pandya) मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात पुनरागमन झाले अन् आयपीएल २०२४ साठी संघाचे नेतृत्व हार्दिककडे सोपवण्याचा निर्णय फ्रँचायझीने घेतला. मुंबई इंडियन्सचा हा निर्णय चाहत्यांना काही पटला नव्हता आणि आज त्यावर मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर यांनी हा निर्णय का घेतला हे स्पष्ट केले. पण, इथून नवा वाद सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत...

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद का काढून घेतलं? Inside Story आली समोर

मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी प्रथमच याबद्दल खुलासा करताना हा 'क्रिकेट निर्णय' असल्याचे सांगितले. म्हणजेच, क्रिकेटचा विचार करून घेतलेला हा निर्णय असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले, "मला वाटते की हा निव्वळ क्रिकेटचा निर्णय होता. हार्दिकला एक खेळाडू म्हणून परत आणण्यासाठी आम्ही ट्रेड विंडोची वाट पाहिली. माझ्यासाठी हा एक संक्रमणाचा टप्पा आहे. भारतात बऱ्याच लोकांना हे समजत नाहीत, ते खूप भावूक होतात. पण, या निर्णयापासून भावना दूर करा. मला वाटते की एक खेळाडू म्हणून रोहित आता सर्वोत्कृष्ट कामगिरी करून दाखवेल,” असे मार्क बाऊचर यांनी स्मॅश स्पोर्ट्स पॉडकास्टवर सांगितले होते. त्यावर रोहित शर्माची पत्नी रितिक सजदेह ( Ritika Sajdeh) हिने तिखट प्रतिक्रिया दिली आहे.


यात अनेक गोष्टी चुकीच्या आहेत! ( so many things wrong with this) अशी प्रतिक्रिया रितिकाने मार्क बाऊचर यांच्या त्या मुलाखतीच्या पॉडकास्टवर दिली. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सर्वकाही योग्य नसल्याचे संकेत मिळत आहेत. रोहित शर्माने आयपीएलमध्ये २४३ सामन्यांत १ शतक व ४२ अर्धशतकासह ६२११ धावा केल्या आहेत. 


 

Web Title: so many things wrong with this! Ritika Sajdeh's comment on Mark Boucher's interview talking about Hardik Pandya taking over MI captaincy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.