कोहलीपेक्षा स्मिथ सरस; पॉन्टिंगचे वक्तव्य

सध्याच्या घडीला कोहली हा जगातील सर्वोत्त्तम फलंदाज आहे, कारण स्मिथ क्रिकेट खेळत नाही. पण जर स्मिथ क्रिकेट खेळत असला असता तर कोहलीपेक्षाच तोच सरस ठरला असता, असं पॉन्टिंगने म्हटलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 19:01 IST2018-07-12T18:59:35+5:302018-07-12T19:01:21+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Smith better than Kohli; Ponting's statement | कोहलीपेक्षा स्मिथ सरस; पॉन्टिंगचे वक्तव्य

कोहलीपेक्षा स्मिथ सरस; पॉन्टिंगचे वक्तव्य

ठळक मुद्देपॉन्टिंग ने जे मत व्यक्त केले आहे ते कोहलीच्या चाहत्यांना बोचणारं आहे.

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला क्रिकेट जगतामध्ये भारताचा विराट कोहली हा सर्वोत्तम फलंदाज आहे, कारण स्टीव्हन स्मिथ खेळत नसल्यामुळेच, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे ते ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने.

पॉन्टिंग ने जे मत व्यक्त केले आहे ते कोहलीच्या चाहत्यांना बोचणारं आहे. पण पॉन्टिंगने यावेळी जे काही दाखले दिले आहेत ते नक्कीच खोटे नाहीत. पॉन्टिंगने यावेळी एका फिरकीपटूचा फलंदाज कसा झाला, त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाच्या संघाचे सारथ्य कसे सांभाळले, याचा उल्लेख पॉन्टिंगने आपल्या वक्तव्यामध्ये केला आहे.

पॉन्टिंग म्हणाला की, " सध्याच्या घडीला कोहली हा जगातील सर्वोत्त्तम फलंदाज आहे, कारण स्मिथ क्रिकेट खेळत नाही. पण जर स्मिथ क्रिकेट खेळत असला असता तर कोहलीपेक्षाच तोच सरस ठरला असता. स्मिथने गेल्या चार वर्षांमध्ये नेत्रदीपक फलंदाजी केली आहे. सातत्य राखले आहे. त्यामुळे मला कोहलीपेक्षा स्मिथ हाच सर्वोत्तम फलंदाज वाटतो. " 

Web Title: Smith better than Kohli; Ponting's statement