पवारांच्या मध्यस्थीने स्मिथ आणि वॉर्नर आयपीएलमध्ये खेळणार

सध्याच्या घडीला स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे क्रिकेटजगतात टीकेचे धनी ठरत आहेत. दक्षिण आफ्रिकेत केलेल्या चेंडूच्या छेडछाडप्रकरणी या दोघांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका वर्षाची बंदी घातली आहे.

By प्रसाद लाड | Published: April 1, 2018 07:23 AM2018-04-01T07:23:22+5:302018-04-01T07:23:22+5:30

whatsapp join usJoin us
Smith and Warner will play in the IPL by the mediators sharad pawar | पवारांच्या मध्यस्थीने स्मिथ आणि वॉर्नर आयपीएलमध्ये खेळणार

पवारांच्या मध्यस्थीने स्मिथ आणि वॉर्नर आयपीएलमध्ये खेळणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई- सध्याच्या घडीला स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे क्रिकेटजगतात टीकेचे धनी ठरत आहेत. दक्षिण आफ्रिकेत केलेल्या चेंडूच्या छेडछाडप्रकरणी या दोघांवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका वर्षाची बंदी घातली आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर बीसीसीआयने आयपीएलमध्ये खेळण्यासही मज्जाव केला होता. पण आयसीसी आणि बीसीसीआयचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने स्मिथ आणि वॉर्नर यांच्यासाठी आता आयपीएलचे दरवाजे खुले झाले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सिडनी येथील पत्रकार परिषदेमध्ये स्मिथ ढसाढसा रडला होता. त्याचे अश्रू पाहून बरेच खेळाडू हेलावले. स्मिथचे रडणे पाहून त्यांचाही उर भरून आला. स्मिथ आणि वॉर्नर यांनी चूक केली आहे, त्याचे समर्थन करता येणार नाही. पण त्यांनी चूक कबूल केली असून, त्यांच्यावर एवढी कठोर कारवाई होता कामा नये, असे बऱ्याच जणांना वाटते. यामध्ये भारताच्या बऱ्याच आजी-माजी क्रिकेटपटूंचाही समावेश आहे. त्यामुळेच त्यांच्या मदतीला काही भारतीय क्रिकेटपटू धावून आले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्मिथ आणि वॉर्नर घडलेल्या प्रकारामुळे व्यथिथ झाले होते. त्यांना या परिस्थितीत नेमके काय करावे, हे सूचत नव्हते. इतक्यात एका भारताच्या माजी महान क्रिकेटपटूने त्यांची ट्विटरवर बाजू मांडली. स्मिथ आणि वॉर्नर यांनी त्यानंतर भारताच्या ' या ' महान क्रिकेटपटूशी संपर्क साधला. त्यानंतर ' या ' महान क्रिकेटपटूने शरद पवार यांचे नाव सुचवले आणि तेच या प्रकरणातून तुम्हाला बाहेर काढू शकतात, असे सांगितले.

स्मिथ आणि वॉर्नर यांनी भारताच्या ' या ' महान क्रिकेटपटूचे आभार मानले. त्याच्याकडून पवार यांचा नंबर मिळवला. त्यानंतर स्मिथने पवार यांच्याशी संवाद साधला. यावेळी स्मिथने पवारांकडे आपली चूक मान्य केल्याचे समजते, त्याचबरोबर काहीही करून मला आणि वॉर्नरला आयपीएलचे दरवाजे बंद करू नका, अशी विनवणीही केली. पवार साहेबांनी स्मिथचे बोलणे ऐकून घेतले. त्यांना तो प्रामाणिकपणे आपली चूक मान्य करत असल्याचे पटले. त्यानंतर त्यांनी स्मिथला, " तुला आणि वॉर्नरला आयपीएलमध्ये प्रवेश मिळवून देतो," असे आश्वासन दिले.

स्मिथला सुरुवातीला या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. कारण बीसीसीआय आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया या मंडळांतील संबंध फारसे चांगले नाहीत. त्याचबरोबर पवारांना एका पारितोषिक वितरण समारंभात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना ढकलले देखील होते. त्यामुळे स्मिथला पवार यांचे म्हणणे खरे वाटत नव्हते. पण या जाणत्या राजाचे मन किती मोठे आहे, याचा अंदाज स्मिथला नव्हता. पवारांनी काही वेळांनी आयसीसीचे अध्यक्ष आणि आपले निकटवर्तीय शशांक मनोहर यांना त्वरीत फोन लावला. त्यांना या दोघांच्या प्रमाणिकतेबद्दल सांगितले आणि त्यांना आयपीएलमध्ये खेळण्यास परवानगी देण्यासही बजावले. त्यानंतर मनोहर यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीबरोबर चर्चा केली आणि स्मिथ व वॉर्नर यांच्यावर काही सामन्यांची बंदी घाला, पण या मोसमात खेळू द्या, असे सांगितले.

आयसीसीचा शब्द बीसीसीआयने पाळला आहे. त्यानुसार बीसीसीआयने स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावरील शिक्षा शिथील केली आहे. त्यांच्यावरील एका वर्षाची बंदी उठवण्याचे बीसीसीआयने ठरविले आहे. आता त्यांना आयपीएलमधील पहिल्या पाच सामन्यांना मुकावे लागणार आहे. बीसीसीआयने स्मिथ आणि वॉर्नर यांना याबद्दल आगाऊ माहिती दिली आहे. त्यानंतर स्मिथने फोनवरच पवार यांचे पाय पकडत तुम्हीच माझे मायबाप असल्याचे म्हटले आहे. आयपीएलसाठी भारतात आल्यावर स्मिथ व वॉर्नर पहिल्यांदा पवार यांची भेट घेणार आहेत.

( आजची 1 एप्रिल ही तारीख लक्षात घेता वाचकांनी या बातमीकडे केवळ मनोरंजनाच्या हेतूने बघावे.)

Web Title: Smith and Warner will play in the IPL by the mediators sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.