ICC T20 World Cup 2026 Pathum Nissanka Record Most Runs In T20Is For Sri Lanka : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात श्रीलंकन सलामीवीर पथुम निसंका हा सातत्यपूर्ण कामगिरीसह संघासाठी बहुमूल्य योगदान देताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळीनंतर झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातही त्याने आपल्या कामगिरीतील सातत्य कायम राखत अर्धशतक ठोकले. आंतरारष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील १९ अर्धशतकी खेळीसह त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
अर्धशतकी खेळीसह साधला विक्रमी डाव
कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या साखळी फेरीतील अखेरच्या सामन्यात श्रीलंकेच्या डावाची सुरुवात करताना संघ अडचणीत असताना निसंकाने पुन्हा एकदा आश्वासक खेळीसह संघाचा डाव सावरणारी खेळी केली. त्याने या सामन्यात ४१ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ६२ धावांची खेळी केली. या खेळीसह त्याने आंतरारष्ट्रीय टी-२० मध्ये श्रीलंकेकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे.
अभिनेत्रींनाही टक्कर देणारी श्रीलंकन क्रिकेटरची ग्लॅमरस पत्नी; फोटो पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
निसंकाने साधला 'नंबर वन' बॅटर होण्याचा डाव
पथुम निसंका याने ८८ व्या सामन्यात २,६२८ धावांचा टप्पा गाठला आहे. याआधी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये श्रीलंकेकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा कुसल परेराच्या नावे होता. त्याने १०४ सामन्यात २५९९ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे. हा विक्रम मागे टाकत निसंका आता छोट्या फॉरमॅटमध्ये लंकेचा नंबर वन बॅटर ठरला आहे.
श्रीलंकेसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा
२,६२८ धावा – पथुम निसांका, सामने: ८८
२,५९९ धावा – कुसल परेरा, सामने: १०४
२,३३५ धावा – थिसारा परेरा, सामने: ९५
१,८८९ धावा – तिलकरत्ने दिलशान, सामने: ८०
१,७९७ धावा – दासुन शनाका, सामने: १२८
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सातव्यांदा साधला फिफ्टी प्लसचा डाव
आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीत दोन शतकी खेळी नावे असलेल्या निसंकाने टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सातव्यांदा फिफ्टी प्लसचा डाव साधला. आतापर्यंत त्याने या स्पर्धेत २२ सामन्यात ६ अर्धशतके आणि एका शतकाच्या जोरावर ६८४ धावा केल्या आहेत.