SL vs NZ Test : शनिवारी खेळाडूंना मिळाली सुट्टी! सामना सहा दिवस चालणार; २३ वर्षांनंतर प्रथमच झालं असं

सध्या श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 14:39 IST2024-09-21T14:21:36+5:302024-09-21T14:39:10+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
sl vs nz test match updates saturday is rest day in Sri Lanka Vs New Zealand Test due to the presidential elections in Sri Lanka  | SL vs NZ Test : शनिवारी खेळाडूंना मिळाली सुट्टी! सामना सहा दिवस चालणार; २३ वर्षांनंतर प्रथमच झालं असं

SL vs NZ Test : शनिवारी खेळाडूंना मिळाली सुट्टी! सामना सहा दिवस चालणार; २३ वर्षांनंतर प्रथमच झालं असं

SL vs NZ Test : सध्या न्यूझीलंडचा संघ श्रीलंका दौऱ्यावर असून, तिथे दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. पहिल्या सामन्यातील तिसऱ्या दिवसअखेर यजमान श्रीलंकेने २०२ धावांची आघाडी घेतली आहे. पण, आज चौथ्या दिवशी शनिवारी सामना खेळवला गेला नाही. श्रीलंकेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत असल्याने रेस्ट डे देण्यात आला आहे. दोन सामन्यांची ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने दोन्हीही संघांसाठी महत्त्वाची असेल. खरे तर या मालिकेतील सलामीचा सामना सहा दिवस खेळवला जाईल. श्रीलंकेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत असल्याने २१ सप्टेंबर रोजी होणारा खेळ रद्द करण्यात आला. 

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना १८ सप्टेंबरपासून खेळवला जात आहे. मागील दोन दशकात प्रथमच श्रीलंकेचा संघ सहा दिवसांचा कसोटी सामना खेळत आहे. २००१ मध्ये शेवटच्या वेळी कोलंबो येथे झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात श्रीलंकेने सहा दिवसांची कसोटी खेळली होती. तेव्हा पोया दिवस साजरा करण्यासाठी एक दिवस खेळ थांबवण्यात आला होता. कसोटी क्रिकेटमध्ये शेवटच्या वेळी २००८ मध्ये बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात रेस्ट डे घोषित करण्यात आला होता. तेव्हाही निवडणुकीमुळे सहा दिवसांचा कसोटी सामना झाला. न्यूझीलंडने शेवटच्या वेळी २०१९ मध्ये श्रीलंकेचा दौरा केला होता. तेव्हा त्यांनी दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत संपवली होती. 

दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमानांनी आपल्या पहिल्या डावात ३०५ धावा केल्या. मग न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात ३४० धावांपर्यंत मजल मारली. दहा धावांच्या आघाडीसह श्रीलंकेने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसअखेर ७२ षटकांत ४ बाद २३७ धावा केल्या.

Web Title: sl vs nz test match updates saturday is rest day in Sri Lanka Vs New Zealand Test due to the presidential elections in Sri Lanka 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.