Join us

SL vs NZ : लंकेच्या 'मॉडर्न' जमान्यातील जयसूर्याची कमाल; मुरलीधरनपेक्षाही निघाला फास्ट

त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या दिग्गजालाही  मागे टाकले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 17:03 IST

Open in App

Prabath Jayasuriya Record : न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा संघ अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आहे. गाले कसोटीत सामन्यात श्रीलंकेचा फिरकीपटू प्रभात जयसूर्यानं (Prabath Jayasuriya record in Test) किवी फलंदाजांची गिरकी घेत अनेक विक्रम प्रस्थापित केले. यात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या दिग्गजालाही  मागे टाकले. 

मुरलीधरनला जमलं नाही ते जयसूर्यानं करून दाखवलं 

न्यूझीलंडच्या पहिल्या डावात प्रभात जयसूर्यानं ६ विकेट्स घेतल्या. त्याच्या फिरकीच्या जाळ्यात फसल्यामुळेंच किवींचा संघ अवघ्या ८८ धावांत आटोपला. पाच विकेट्सच्या कामगिरीसर जयसूर्यानं खास पराक्रमाची नोंद केली. १६ व्या कसोटी सामन्यात त्याने नवव्यांदा तो पाच विकेट्स हॉलमध्ये सामील झाला. कसोटी कारकिर्दीत पदार्पणानंतर  त सर्वाधिक वेळा पाच विकेट्स हॉलचा पराक्रम करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या तो दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. याबाबतीत दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन याला मागे टाकले आहे.

अश्विनसोबत संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर, मग टॉपला कोण?

 मुरलीधरन याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिल्या १६ कसोटी सामन्यात फक्त ३ वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.  याबाबतीत न्यूझीलंडमध्ये जन्मलेला दिग्गज ऑस्ट्रेलियन क्रिकेटर क्लेरी ग्रिमेट अव्वलस्थानी आहे. त्याने १६ कसोटीत १० वेळा पाच विकेट्स घेतल्या होत्या.   प्रभात जयसूर्या हा १६ कसोटी सामन्यातील ९ फाइव्ह विकेट्स हॉलसह भारताच्या आर अश्विनसोबत संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे. 

पहिल्या १६ कसोटी सर्वाधिक वेळा ५ विकेट्स घेणारे गोलंदाज 

  • १० - क्लेरी ग्रिमेट 
  • ९ - रविचंद्रन अश्विन 
  • 9 - प्रभात जयसूर्या 
  • ८ - सुभाष गुप्ते
  • ३- मुरलीधरन

एकंदरीत विचार करायचा तर कारकिर्दीत सर्वाधिक वेळा ५ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादी मुरलीधरनच अव्वलस्थानी आहे. या दिग्गजानं ६७ वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम करून दाखवला आहे.  

श्रीलंकेकडून सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेणारे गोलंदाज  

 

  • ६७ - मुथय्या मुरलीधरन 
  • ३४ - रंगना हेराथ 
  • १२ - चामिंडा वास 
  • ९ - प्रभात जयसूर्या 
टॅग्स :श्रीलंकान्यूझीलंडआर अश्विन