Join us

SL vs IND : भारतासाठी 'करा किंवा मरा'चा सामना; रोहितने अखेरच्या सामन्यासाठी केला मोठा बदल

SL vs IND 3rd ODI : आज श्रीलंका आणि भारत यांच्यात अखेरचा ट्वेंटी-२० सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 14:45 IST

Open in App

SL vs IND 3rd ODI Live Updates : आज श्रीलंका आणि भारत यांच्यात तिसरा ट्वेंटी-२० सामना खेळवला जात आहे. श्रीलंकेने सलामीचा सामना अनिर्णित करून भारताला मोठा धक्का दिला होता. त्यात त्यांनी दुसरा सामना जिंकून ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी मजबूत आघाडी घेतली. त्यामुळे आजचा अखेरचा सामना भारतासाठी 'करा किंवा मरा' असाच आहे. भारताचा आजचा विजय मालिका बरोबरीत संपवू शकतो. पण, सामना श्रीलंकेने जिंकल्यास अथवा अनिर्णित संपल्यास यजमान संघ मालिका जिंकेल. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आधीच्या दोन्हीही सामन्यांमध्ये प्रथम फलंदाजी केली होती. त्यामुळे पुन्हा एकदा भारताची कोंडी झाल्याचे दिसते. कर्णधार रोहित शर्माने पहिल्या दोन सामन्यांमध्ये एकट्याने किल्ला लढवला पण भारताच्या मधल्या फळीला सामन्याचा शेवट करण्यात अपयश आले.  

आजच्या सामन्यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्माने दोन मोठे बदल केले. रियान परागला पदार्पणाची संधी मिळाली आहे, तर रिषभ पंतलाही संघात जागा मिळाली आहे. तर अर्शदीप सिंग आणि लोकेश राहुल यांना डच्चू देण्यात आला. 

भारतीय संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज. 

श्रीलंकेचा संघ -चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानगे, कामिंदू मेंडिस, डुनिथ वेलालगे, महेश तीक्ष्णा, जेफरी वांडरस, असिथा फर्नांडो.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्मालोकेश राहुलअर्शदीप सिंगरिषभ पंत