Join us

SL vs IND Live : यजमानांनी टॉस जिंकला! सिराज vs शिराज; राहुलला संधी, रोहितची मिश्किल टिप्पणी

SL vs IND 1st ODI Match Live : आज श्रीलंका आणि भारत यांच्यात पहिला वन डे सामना होत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 14:08 IST

Open in App

SL vs IND 1st ODI Match Live Macth Updates In Marathi | कोलंबो : ट्वेंटी-२० मालिका ३-० ने खिशात घातल्यानंतर भारतीय संघ वन डे मालिकेसाठी सज्ज आहे. या मालिकेतून कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह लोकेश राहुल, श्रेयस अय्यर यांचे पुनरागमन झाले आहे. कोलंबो येथे शेवटच्या वेळी भारतीय संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेशी भिडला होता. २०२३ मध्ये झालेल्या या सामन्यात मोहम्मद सिराजचे वादळ पाहायला मिळाले होते. त्याने घातक गोलंदाजी केल्याने यजमान संघ अवघ्या ५० धावांत गारद झाला होता. मागील दहा वर्षांपासून श्रीलंकेची भारताविरूद्धची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली असून, २४ पैकी केवळ ३ सामने जिंकण्यात श्रीलंकेला यश आले आहे.  

सलामीच्या वन डे सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वन डे मालिका कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवली जात आहे. भारतीय संघात मोहम्मद सिराज तर श्रीलंकेच्या संघात मोहम्मद शिराजचा समावेश आहे. यष्टीरक्षक म्हणून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. या कठीण प्रश्नावर व्यक्त होताना रोहितनेही भाष्य करणे टाळले होते. मात्र, आज अखेर उत्तर मिळाले असून लोकेश राहुलला संधी देण्यात आली आहे, तर रिषभ पंत बाकावर असेल. नाणेफेकीवेळी रोहित मिश्किलपणे म्हणाला की, मी प्रामुख्याने माझ्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करेन. कारण गोलंदाजी करण्यासाठी आमच्या संघात इतर गोलंदाज आहेतच. 

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रिंकू सिंग, मोहम्मद सिराज.

श्रीलंकेचा संघ -चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, जनिथ लियांगे, वानिंदू हसरंगा, अकिला धनंजया, असिथो फर्नांडो, डुनिथ वेलालेज, मोहम्मद शिराज.

वन डे मालिकेचे वेळापत्रक - पहिला सामना - २ ऑगस्ट दुसरा सामना - ४ ऑगस्ट तिसरा सामना - ७  ऑगस्ट  

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकारोहित शर्मालोकेश राहुलमोहम्मद सिराज