इंग्लंडच्या संघाने घरच्या मैदानावर खेळणाऱ्या श्रीलंकेला शंभरीच्या आत गुंडाळत सुपर ८ मधील पहिल्या विजयाची नोंद केली आहे. पहिल्यांदा फलंदाजी करताना फिल सॉल्टच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने १४६ धावा करत श्रीलंकेसमोर १४७ धावांचे टार्गेट सेट केले होते. विल जॅक्सनं गोलंदाजी दाखवलेली पॉवर अन् त्यानंतर अन्य गोलंदाजांनी दाखवलेली धमक दाखवत श्रीलंकेला ९५ धावांत ऑलआउट करत ५१ धावांनी सामना जिंकला. इंग्लंडच्या संघाने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध मिळवलेला हा सलग १२ वा विजय ठरला.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
धावांचा पाठलाग करताना पॉवरमध्येच लंकेचा अर्धा संघ तंबूत
कँडीतील पेल्लेकेलेच्या मैदानात धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ सहज बाजी मारेल, असे वाटत होते. पण तिसऱ्या षटकात जोफ्रा आर्चरनं फॉर्ममध्ये असलेल्या पथुम निसंकाला अवघ्या ९ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर विल जॅक्स पिक्चरमध्ये आला. चौथ्या षटकात त्याने कुसल मेंडिस आणि पवन रथनायके यांना एका पाठोपाठ बाद करत इंग्लंडला मॅचमध्ये आणले. पॉवरप्लमध्ये विल जॅक्सनं तीन विकेट्स घेतल्या तर जोफ्रानं दोन विकेट्स घेत श्रीलंकेची अवस्था ५ बाद ३४ अशी बिकट केली. या धक्क्यातून श्रीलंका काही सावरली नाही.
इंग्लंडच्या संघाचा कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव करुन दाखवण्याचा खास रेकॉर्ड
- १२८/९ विरुद्ध श्रीलंका, पल्लेकेले, २०२६ (१२ धावांनी विजयी)
- १२९/६ विरुद्ध पाकिस्तान, अबू धाबी, २०१२ (५ धावांनी विजयी)
- १४२/७ विरुद्ध अफगाणिस्तान, दिल्ली, २०१६ विश्वचषक (१५ धावांनी)
- १४६/९ विरुद्ध श्रीलंका, पल्लेकेले, २०२६ विश्वचषक (२० धावा)*
Web Summary : England defeated Sri Lanka by 51 runs in a Super 8 match. Phil Salt's fifty helped England set a target of 147. Will Jacks' powerful bowling and other bowlers' support led to Sri Lanka being all out for 95. This is England's 12th consecutive T20I win against Sri Lanka.
Web Summary : इंग्लैंड ने सुपर 8 मुकाबले में श्रीलंका को 51 रनों से हराया। फिल सॉल्ट के अर्धशतक से इंग्लैंड ने 147 रनों का लक्ष्य रखा। विल जैक्स की शानदार गेंदबाजी और अन्य गेंदबाजों के समर्थन से श्रीलंका 95 रनों पर ऑल आउट हो गया। यह श्रीलंका के खिलाफ इंग्लैंड की लगातार 12वीं टी20 जीत है।