Join us

‘सिक्सर किंग’ युवराजच्या कामगिरीकडे लक्ष;दिल्ली कॅपिटल्सचे कडवे आव्हान

मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या १२ व्या सत्रातील सलामी रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार असून या लढतीत सर्वांचे लक्ष यंदा प्रथमच मुंबईकडून खेळणाऱ्या युवराज सिंगकडे असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 05:45 IST

Open in App

मुंबई : मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या १२ व्या सत्रातील सलामी रविवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार असून या लढतीत सर्वांचे लक्ष यंदा प्रथमच मुंबईकडून खेळणाऱ्या युवराज सिंगकडे असेल. त्याचप्रमाणे, डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट जसप्रीत बुमराह आणि दुखापतीतून पुनरागमन करणारा अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्यावरही सर्वांची नजर असेल. पांड्या सहा महिन्यात दोनदा जखमी झाला. त्यामुळेच आशिया चषक आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळला नव्हता. दिल्लीविरुद्ध खेळण्याचा निर्णय स्वत: पांड्याला घ्यावा लागेल, असे मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचे मत आहे. याशिवाय दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या अनुपस्थितीत बुमराह वेगवान माऱ्याची बाजू सांभाळेल का, हा उत्सुकतेचा विषय आहे.फलंदाजीसाठी मुंबई संघाकडे युवराजसिंग, किएरॉन पोलार्ड, बेन कटिंग आणि सूर्यकुमार यादव, तर गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारण्यास बरिंदर सरन, मिशेल मॅक्क्लेनघन, कृणाल पांड्या, जयंत यादव, अनुकूल रॉय, राहुल चहर आणि मयांक मार्कंडेय सज्ज आहेत. दुसरीकडे, नव्या नावाने यंदाच्या सत्रात खेळणारे दिल्लीकर कसा खेळ करतात याचीही उत्सुकता क्रिकेटप्रेमींमध्ये आहे. याआधी दिल्ली डेअरडेव्हिल्स नावाने स्पर्धेत सहभागी झालेल्या दिल्लीकरांना अद्याप या स्पर्धेत म्हणावी तशी छाप पाडता आली नव्हती. दिल्ली कॅपिटल्ससाठी शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, पृथ्वी शॉ, मनज्योत कार्ला, कोलिन मुन्रो आणि ख्रिस मॉरिस यांच्यावर फलंदाजीची मदार आहेत. तसेच ट्रेंट बोल्ट, इशांत शर्मा, कासिगो रबाडा आणि नाथूसिंग गोलंदाजीची बाजू सांभाळणार आहेत. (वृत्तसंस्था)स्थळ: वानखेडे स्टेडियम, वेळ: रात्री ८ वाजल्यापासून

टॅग्स :युवराज सिंगआयपीएल 2019