नवी दिल्ली : सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सहा उमेदवार भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत. त्यात भारताच्या लालचंद राजपूत, रॉबिन सिंह, न्यूझीलंडचे माइक हेसन, वेस्ट इंडिजचे फिल सिमन्स, आॅस्ट्रेलियाच्या टॉम मुडी यांचा समावेश आहे.या सर्व उमेदवारांनी कपिल देव यांच्या नेतृत्वातील क्रिकेट सल्लागार समितीसमोर आपले सादरीकरण केले. प्रशिक्षकपदाबाबत अंतिम निर्णय या अठवड्याच्या अखेरपर्यंत किंवा पुढच्या अठवड्याच्या सुरुवातीला निर्णय होणे अपेक्षित आहे.बोर्डाच्या अधिकाऱ्याने सांगितले की ‘या सहा उमेदवारांनी सीएसीसमोर प्रेझेंटेशन केले आहे. असे समजले जात आहे की सीएसीने त्यांना मुलाखतीसाठी निवडले आहे.’ सध्याचे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांना पुढच्या ४५ दिवसांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. हे सर्व सध्या भारतीय संघासोबत वेस्ट इंडिज दौºयावर आहेत. उमेदवारांपैकी सिमन्स यांच्याकडे आयर्लंड आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेट प्रशिक्षक पदाचा चांगला अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनात दोन्ही संघांनी यश मिळवले. २०१६ च्या विश्व टी२० स्पर्धेत वेस्ट इंडिजला जेतेपद मिळवून देण्यातदेखील सिमन्स यांचा मोठा वाटा आहे. माइक हेसन हे न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक आहेत. तर टॉम मुडी हे श्रीलंकेचे प्रशिक्षक आहेत. मुडी हे सनरायजर्स हैदराबादचे प्रशिक्षक म्हणून देखील काम पाहतात.भारतीय उमेदवारांपैकी रॉबिन सिंह हे टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते. ते सर्वकालिक सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहेत. २००७ मध्ये झालेल्या पहिल्या टी २० विश्वचषकातील विजेत्या भारतीय संघाचे ते प्रशिक्षकदेखील होते. लालचंद राजपूत हे त्याच संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. रवी शास्त्री हे संघाचे जून २०१६ पर्यंत संचालक होते. २०१७ मध्ये अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षकपद सोडल्यानंतर त्यांची नियुक्ती मुख्य प्रशिक्षक म्हणून झाली.सहायक प्रशिक्षकांची देखील नियुक्ती केली जाणार आहे. सहायक प्रशिक्षकांची नियुक्ती एम.एस.के. प्रसाद यांच्या नेतृत्वातील निवड समिती करणार आहे.विराट कोहलीची पसंती शास्त्रींनाचवेस्ट इंडिज दौºयावर जाण्यासाठी कर्णधार विराट कोहलीने म्हटले होते की, ‘रवी शास्त्री हेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक व्हायला हवे.’ रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघ २०१६ टी २० विश्वचषक २०१५ आणि २०१९ विश्वचषक जिंकण्या िअपयशी ठरला असला तरी कोहली आणि शास्त्री या जोडीच्या काळातच भारतीय संघ विश्व कसोटी रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर पोहचला. आणि आॅस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात पराभूत करण्याची ऐतिहासिक कामगिरीही याच काळात संघाने केली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत सहा दिग्गज, शास्त्रींसह ही नावे चर्चेत
भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत सहा दिग्गज, शास्त्रींसह ही नावे चर्चेत
सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह सहा उमेदवार भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 3:21 AM