Join us

घरी बसल्याने स्वत:ची चीड येते : सॅम कुरेन

सीएसकेकडून खेळलेला कुरेन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाला,

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 05:46 IST

Open in App

नवी दिल्ली : पाठदुखीतून सावरत असलेला इंग्लंडचा अष्टपैलू सॅम कुरेन यंदा आयपीएल खेळत नसल्यामुळे निराश आहे. तरीही लिलावातून माघार घेण्याच्या निर्णयाचे त्याने समर्थन केले. कारकिर्दीतील सर्वांत गंभीर दुखापतीतून बाहेर पडत असताना आयपीएल खेळणे अतिघाईचे ठरले असते, असे मत कुरेनने व्यक्त केले.

सीएसकेकडून खेळलेला कुरेन क्रिकइन्फोशी बोलताना म्हणाला, ‘घरी बसल्याने स्वत:वर चीड येते, यामुळे निराश आहे. घरी बसून आयपीएल सामने पाहणे फारच निराशादायी ! मी लिलावात सहभागी होऊ इच्छित होतो. मात्र, माघार घेतली. माझा निर्णय सर्वोत्कृष्ट होता. मागे वळून पाहताना वाटते की, खेळणे माझ्यासाठी अतिघाईचे ठरले असते.’ २३ वर्षांचा डावखुरा मध्यम जलद गोलंदाज कुरेनला मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात पाठीच्या खालच्या भागात ‘स्ट्रेस फ्रॅक्चर’ झाले होते. तो म्हणाला,‘ आयपीएलसारख्या टी-२० लीग दरम्यान अनेक खेळाडूंच्या सहवासात बरेच शिकायला मिळते.’ 

टॅग्स :आयपीएल २०२२सॅम कुरेन
Open in App