ब्रॅडमन म्युझिअम, भारतीय खेळाडूंच्या अविस्मरणीय खेळी अन् बरंच काही; हर्षा भोगलेंच्या नजरेनं ऑस्ट्रेलिया सफर 

ऑस्ट्रेलिया हा अनेक प्रतिभांचा आणि अनेक आकर्षणांचा देश आहे. अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि वन्यजीवन अनुभवण्यासाठी तुम्ही या देशाला भेट देऊ शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 02:20 PM2020-09-01T14:20:59+5:302020-09-01T14:21:52+5:30

whatsapp join usJoin us
Sir Don Bradman Museum, unforgettable performances by Indian players; Travel to Australia through the eyes of Harsha Bhogle | ब्रॅडमन म्युझिअम, भारतीय खेळाडूंच्या अविस्मरणीय खेळी अन् बरंच काही; हर्षा भोगलेंच्या नजरेनं ऑस्ट्रेलिया सफर 

ब्रॅडमन म्युझिअम, भारतीय खेळाडूंच्या अविस्मरणीय खेळी अन् बरंच काही; हर्षा भोगलेंच्या नजरेनं ऑस्ट्रेलिया सफर 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देअॅडलेड ओव्हलचे एक वैशिष्ट्य म्हणजे ब्रॅडमन कलेक्शन. १९९२मध्ये ताज्या दमाच्या सचिन तेंडुलकरने पर्थमध्ये ठोकलेले लक्षणीय शतक

- हर्षा भोगले, क्रिकेट समालोचक

ऑस्ट्रेलिया हा अनेक प्रतिभांचा आणि अनेक आकर्षणांचा देश आहे. अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि वन्यजीवन अनुभवण्यासाठी तुम्ही या देशाला भेट देऊ शकता. उत्कृष्ट खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी किंवा अविश्वसनीय संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठीही या देशाला भेट देऊ शकता. मात्र, तुम्ही माझ्यासारखेच कायमस्वरूपी क्रिकेटच्या प्रेमात बुडालेले असाल, तर ऑस्ट्रेलिया हे क्रीडा प्रेमींच्या बकेट लिस्टमधील स्थळ आहे.  हे तुम्हाला आधीपासून माहीत असेलच. इतिहासातील काही सर्वोत्तम सामने याच भूमीवर खेळले गेले आहेत. तुम्ही जेव्हा ऑस्ट्रेलियाला जाल, तेव्हा तुमच्या स्थलदर्शनाच्या यादीत या देशातील स्टेडियम्स नक्कीच असूद्या:

गॅबा म्हणून ओळखल्या जाणा-या ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंडपासून सुरुवात कराल तर उत्तम. क्वीन्सलॅण्ड क्रिकेटचे माहेरघर असलेले हे स्टेडियम कसोटी सामने व मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी तर सर्वांचे आवडते आहेच, शिवाय ते ब्रिस्बेनचे अव्वल दर्जाचे ओव्हल स्पोर्टिंग स्टेडियम आहे. क्रिकेट शिवाय या स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियन फूटबॉल लीगचे (एएफएल) सामनेही होतात आणि ब्रिस्बेन लायन्सचे हे होम स्टेडियम आहे. 

मी जेव्हा-जेव्हा सिडनीला जातो, तेव्हा-तेव्हा सिडनी क्रिकेट ग्राउंड किंवा एससीजीला जाऊन माझ्या काही आवडत्या स्मृतींना उजळा द्यायला मला खूप आवडते. तुम्हीही इतिहासाच्या गल्ल्यांमध्ये थोडाफेरफटका मारून या आणि एससीजी गाइडेड वॉकिंगटूर घ्यायला विसरू नका. या टूरमध्ये तुम्हाला या स्टेडियमच्या सर्वोत्तम आकर्षण स्थळांना भेट देता येईल. मेंबर्स स्टॅण्ड आणि लेडीज पॅव्हिलियन या दोन ऐतिहासिक आणि वारसा स्थळांमध्ये स्थान मिळवलेल्या ग्रॅण्ड स्टॅण्ड्सना भेट देण्याची संधी तुम्हाला या टूरमुळे मिळेल. 

मी आत्तापर्यंत घेतलेल्या सर्वांत स्मरणीय आणि रमणीय वॉक्स मधील एक म्हणजे अॅडलेड ओव्हलवर घेतलेला वॉक. अॅडलेड ओव्हल हे नक्कीच ऑस्ट्रेलियातील आणि जगभरातील सर्वांत सुंदर क्रीडा संकुलांपैकी एक आहे. भव्य अॅडलेड शहर आणि त्याची देखणी किनारपट्टी एका दृष्टिक्षेपात बघण्यासाठी रूफक्लाइंबमध्ये भाग घ्या, या स्टेडियमवरील अनेक कॅफेज, रेस्टोरंट्स आणि बार्स पैकी कोणत्याही ठिकाणी चविष्ट जेवणाचा किंवा स्नॅक्सचा आस्वाद घ्या. तुम्ही संपूर्ण स्टेडियमची टूर घेतलीत तर एरवी सर्वांसाठी खुल्या नसलेल्या अनेक भागांमध्ये तुम्हाला मुक्त प्रवेश मिळेल . यांमध्ये १००वर्षे जुन्या स्कोअर बोर्डचा तसेच खेळाडूंच्या चेंज-रूमचा समावेश होतो. 

अॅडलेड ओव्हलचे एक वैशिष्ट्य म्हणजे ब्रॅडमन कलेक्शन. क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाज सर डॉनल्ड ब्रॅडमन यांच्या व्यक्तिगत वापरातील वस्तूंचे तसेच कलाकृतींचे दर्शन घडवणारे हे म्युझियम खास विकसित करण्यात आले आहे. हे म्युझियम म्हणजे प्रत्येक क्रिकेटप्रेमी व्यक्तीचे स्वप्न आहे. कारण या म्युझियमच्या थिएटरमध्ये तुम्ही ब्रॅडमन यांनी क्रिकेटच्या मैदानावर घालवलेले काही सर्वोत्तम क्षण डोळ्यांत साठवू शकता आणि येथील इंटरअॅक्टिव एक्झिबिटमध्ये तुमच्या स्वत:च्या कौशल्यांवरील धूळही झटकून बघू शकता. 

या महत्त्वाच्या स्थळांना दिलेल्या प्रत्येक भेटीत मी काळाच्या उदरातील काही ऐतिहासिक क्षण पुन्हा जगून घेतो. १९९२मध्ये ताज्या दमाच्या सचिन तेंडुलकरने पर्थमध्ये ठोकलेले लक्षणीय शतक, व्ही व्ही एस लक्ष्मणने १९९०-२००० मध्ये एससीजीवर केलेले त्याच्या कारकिर्दीला ठामपणा देणारे शतक आणि वाकावर २००८मध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर मिळवलेला ऐतिहासिक विजय आणि हो २०१८मध्ये भारतीय संघाने मेलबर्न येथे प्राप्त केलेल्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाच्या आठवणी तर आयुष्यभर टिकतीलच!
 

Web Title: Sir Don Bradman Museum, unforgettable performances by Indian players; Travel to Australia through the eyes of Harsha Bhogle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.