Join us

सिंघानिया गर्ल्स संघाने जिंकला क्रिकेट चषक

सिघांनिया शाळेच्या मैदानावर झालेल्या मुलींंच्या क्रिकेट संघात सिंघानिया, लोकपुरम, श्रीमॉ, वसंतविहार, पॉवर पब्लिक स्कूल आणि नॅशनल एज्युकेशन स्कूल शाळेच्या संघानी भाग घेतला होता. वसंतविहार आणि सिंघानिया यांच्यात झालेल्या अंतिम लढतीमध्ये सिंघानिया संघाने ९९ धावांचे लक्ष्य १४.४ षटकांमध्ये पूर्ण करुन विजयश्री खेचून आणली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 22:46 IST

Open in App
ठळक मुद्दे सिंघानिया आणि वसंत विहार यांच्यात अंतिम लढत सिंघानियाने १४.४ षटकांमध्ये पूर्ण केले ९९ धावांचे लक्ष्यकॅप्टन धनश्री वाघमारे हिने रचला ५४ धावांचा डोंगर

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: सिंघानिया स्कूल गर्ल्स क्रिकेट संघाने वसंत विहार स्कूल संघावर मात करीत सिंघानियाचा पहिलाच क्रिकेट चषक पटकविला. शहरातील सहा संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.सिघांनिया शाळेच्या मैदानावर झालेल्या मुलींंच्या क्रिकेट संघात सिंघानिया, लोकपुरम, श्रीमॉ, वसंतविहार, पॉवर पब्लिक स्कूल आणि नॅशनल एज्युकेशन स्कूल शाळेच्या संघानी भाग घेतला होता. १८ आॅक्टोबर पासून सुरु झालेल्या या स्पर्धांचा अंतिम सामना ५ नोव्हेंबर रोजी झाला. वसंत विहार आणि सिंघानिया यांच्यात अंतिम लढत झाली. नाणेफेक जिंकून वसंतविहार संघाने पहिली फलंदाजी घेतली. १५ षटकांमध्ये वसंत विहार संघाने ९९ धावांची नोंद केली. तर सिंघानिया संघाने मात्र १४.४ षटकांत १०० धावा करुन सिंघानिया गर्ल्स क्रिकेटचा पहिलाच चषक खेचून आणला.

सात विकेट घेऊन सिंघानिया संघाची कॅप्टन धनश्री वाघमारे हिने नॉट आऊट ५४ धावा काढल्या. संपूर्ण संघाचे सिघांनिया स्कूलचे अध्यक्ष मनिष नार्वेकर, मुख्य प्रशिक्षक नरेश वाघमारे आदींनी अभिनंदन केले.

 

टॅग्स :ठाणेशाळा