झिम्बाब्वेच्या टी-२० संघाचा कर्णधार सिकंदर रझा याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रझाचा लहान भाऊ मोहम्मद महदी याचं वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी निधन झालं आहे. सोमवारी, २९ डिसेंबर रोजी महदीने अखेरचा श्वास घेतला. त्याच्यावर हरारे येथील वॉरेन हिल्स स्मशानभूमीत मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जन्मापासूनच गंभीर आजाराशी झुंज
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, महदी हा जन्मापासूनच रक्तविकार या आजाराने ग्रस्त होता. या आजारात रक्त गोठत नाही, त्यामुळे कोणतीही जखम गंभीर ठरू शकते. अलीकडेच तब्येतीत गुंतागुंत निर्माण झाल्यामुळे त्याचं निधन झालं.
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने दिली माहिती
झिम्बाब्वे क्रिकेटने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, "झिम्बाब्वे क्रिकेट (ZC) टी-२० संघाचा कर्णधार सिकंदर रझा आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करत आहोत. त्याचा धाकटा बंधू मोहम्मद महदी यांचे २९ डिसेंबर २०२५ रोजी हरारे येथे वयाच्या १३ व्या वर्षी दुःखद निधन झाले. महदी जन्मतःच हिमोफिलियाने ग्रस्त होता आणि वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांचे निधन झाले. ३० डिसेंबर २०२५ रोजी वॉरेन हिल्स स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या कठीण काळात झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड, व्यवस्थापन, खेळाडू आणि कर्मचारी रझा कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहेत. महदीच्या आत्म्याला शांती लाभो."
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देत...
रझा हा झिम्बाब्वे संघाचा कणा
अलीकडेच रझाने ILT20 स्पर्धेत शारजाह वॉरियर्स संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्याने १० सामन्यांत १७१ धावा आणि १० विकेट्स घेतल्या. मात्र त्याच्या अष्टपैलू कामगिरीनंतरही संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला. वॉरियर्सने १० पैकी केवळ ३ सामने जिंकले. रझा हा झिम्बाब्वे संघाचा कणा आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत तो आपल्या देशाचे नेतृत्व करणार आहे. आगामी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत झिम्बाब्वेचा संघ हा ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड आणि ओमान यांच्यासोबत 'ब' गटात आहे.