Join us

मुंबईच्या कर्णधारपदी सिद्धेश लाडची वर्णी

मुंबईला गेल्या सामन्यात गुजरातकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार असलेल्या धवल कुलकर्णीला संघातून डच्चू देण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 20:27 IST

Open in App

मुंबई : महाराष्ट्रविरुद्ध होणाऱ्या रणजी क्रिकेट सामन्यासाठी मुंबईच्या कर्णधारपदी संकटमोचक सिद्धेश लाडची निवड करण्यात आली आहे. हा सामना 6 ते 9 डिसेंबर या कालावधीमध्ये पुण्यात होणार आहे.

मुंबईला गेल्या सामन्यात गुजरातकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवानंतर मुंबईचा कर्णधार असलेल्या धवल कुलकर्णीला संघातून डच्चू देण्यात आला आहे. धवलच्या जागी आता मुंबईचे नेतृत्व सिद्धेशकडे सोपवण्यात आले आहे.

मुंबईचा संघ : सिद्धेश लाड (कर्णधार), आदित्य तरे, सूर्यकुमार यादव, जय बिस्ता, शिवम दुबे, एकनाथ केरकर, अरमान जाफर, कर्ष कोठारी, आकाश पारकर, शुभम रांजणे, ध्रुवील मटकर, भुपेन ललवानी, शिवम मल्होत्रा, रोस्टन डायस, मिनाद मांजरेकर

टॅग्स :रणजी करंडकमुंबई