Join us

टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिलच्या कुटुंबीयांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

जलालाबादजवळ चक खेरे गावात राहणाऱ्या शुबमनचे कुटुंबीय शेतकरी आहेत. शुबमनचे आजोबा दीदारसिंह यांनी नव्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलनात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती.

By स्वदेश घाणेकर | Updated: December 3, 2020 13:50 IST

Open in App

नव्या कृषी कायद्याविरोधात उत्तर भारतात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्यामुळे संपूर्ण भारतीयांचे त्याकडे लक्ष लागले आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना पद्म विभूषण पुरस्कार परत केले आहे. टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिल ( Shubman Gill) याच्या कुटुंबीयांनाही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ते शेतकरी आंदोलनाच्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवून आहेत.

जलालाबादजवळ चक खेरे गावात राहणाऱ्या शुबमनचे कुटुंबीय शेतकरी आहेत. शुबमनचे आजोबा दीदारसिंह यांनी नव्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलनात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यांचे वय लक्षात घेता त्यांना आंदोलनस्थळी जाण्यापासून शुबमनचे वडील लखविंदर सिंह यांनी रोखले. ते म्हणाले,''माझ्या वडिलांनाही आंदोलनात सहभागी व्हायचे होते, परंतु आम्ही त्यांना न जाण्याची विनंती केली.''

''शुबमनलाही लहानपणापासून शेतीची आवड होती आणि त्यानं गावात असताना बराच काळ शेतात घालवला आहे. कुटुंबातील सदस्यांना शेतात काम करताना त्यानं पाहिलं आहे. त्यानेही शेतात काम केले आहे आणि हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाचे आहे, याची त्याला जाण आहे,''असेही लखविंदरसिंह म्हणाले. 

तो क्रिकेटपटू झाला नसता, तर शेतकरी नक्कीच झाला असता, असेही ते म्हणाले.''तो गावाशी प्रचंड अटॅच आहे आणि लहानपणी शेतात क्रिकेट खेळायचा. त्याला आजही शेती करण्याची आवड आहे आणि क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर गावात  येऊऩ शेती करणार असल्याचे तो नेहमी सांगतो.''  

टॅग्स :शुभमन गिलशेतकरी संप