Join us  

शुबमन गिलला नेक्स्ट विराट बनायचंय! सुरेश रैनाचं विधान; म्हणाला, रोहितसारखा तो...

भारतीय क्रिकेटमधील सध्याच्या घडीला सर्वाधिक पसंतीचा फलंदाज म्हणून शुबमन गिल ( Shubman Gill) हे नाव आघाडीवर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 2:01 PM

Open in App

भारतीय क्रिकेटमधील सध्याच्या घडीला सर्वाधिक पसंतीचा फलंदाज म्हणून शुबमन गिल ( Shubman Gill) हे नाव आघाडीवर आहे. आशिया चषक २०२३ स्पर्धेत भारताच्या युवा सलामीवीराने ३०३ धावा कुटल्या आणि २०२३ वर्षात भारताकडून सर्व फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा त्याच्या नावावर आहे. आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत शुबमनच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या असणार आहेत. त्याचा फॉर्म पाहता सुरुवातीच्या काळातील विराट कोहली अनेकांना आठवला आणि चेन्नई सुपर किंग्सचा स्टार फलंदाज सुरेश रैनाने ( Suresh Raina) मोठं विधान केलं आहे.

जिओ  सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत रैना म्हणाला की, शुबमन गिलला पुढचा सुपरस्टार आणि विराट कोहली बनायचे आहे आणि मला खात्री आहे की तो त्याच्या आदर्शच्या पावलावर पाऊल ठेवेल. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत शुबमन हा भारताचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू असणार आहे आणि २०१९मध्ये रोहित शर्माने जो करिष्मा केला होता, तसाच शुबमन यंदाचा वर्ल्ड कप गाजवेल.

''शुबमन हा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे. मला माहित्येत त्याला सुपरस्टार बनायचे आहे आणि त्याला नेक्स्ट विराट कोहली बनायचेय. तो प्रवास सुरू झाला आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आपण यावर नक्की चर्चा करताना दिसू. तो ज्यावेळाने हात फिरवून चेंडूवर आघात करतो, ते कौतुकास्पद आहे. फिरकीपटूंना त्याला नेमका चेंडू कुठे टाकावा हेच कळत नाही. जलदगती गोलंदाजाने चेंडू स्विंग केला नाही, तर तो अगदी सहजतेने फटका खेचतो. आता थांबायचे नाही, हिच त्याची मानसिकता आहे,''असेही रैना म्हणाला.

तो पुढे म्हणाला, रोहित शर्माने २०१९च्या वर्ल्ड कपमध्ये जसा खेळ केला होता, तसाच खेळ यंदा शुबमनकडून पाहायला मिळेल. तो संपूर्ण ५० षटकं फलंदाजी करेल.  जन्मताच तो लिडर बनण्याचे कौशल्य घेऊन आला आहे आणि त्याने त्याच्या खेळीतून सिद्ध केले आहे.''

टॅग्स :शुभमन गिलविराट कोहलीसुरेश रैनावन डे वर्ल्ड कप