चोरी चोरी, चुपके चुपके! शुबमन गिल-सारा तेंडुलकर सोबत, कॅमेरा पाहताच गिलची 'कलटी', Video 

Shubman Gill affair with Sara Tendulkar? भारतीय क्रिकेट संघाचा युवा स्टार शुबमन गिल याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 04:28 PM2023-11-01T16:28:41+5:302023-11-01T16:29:14+5:30

whatsapp join usJoin us
Shubman Gill, Sara Tendulkar keeping affair private before making it official? duo avoid getting clicked together, Video  | चोरी चोरी, चुपके चुपके! शुबमन गिल-सारा तेंडुलकर सोबत, कॅमेरा पाहताच गिलची 'कलटी', Video 

चोरी चोरी, चुपके चुपके! शुबमन गिल-सारा तेंडुलकर सोबत, कॅमेरा पाहताच गिलची 'कलटी', Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shubman Gill affair with Sara Tendulkar? भारतीय क्रिकेट संघाचा युवा स्टार शुबमन गिल याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालतोय. शुबमन आणि सचिन तेंडुलकरची कन्या सारा यांच्यात प्रेम असल्याच्या चर्चा सतत सुरू असतात, परंतु या दोघांनीही कधीही त्याबाबत वक्तव्य केले नाही.  पण, यांच्या नात्याच्या चर्चांना आणखी फोडणी देणारा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे.  ज्यानंतर चाहत्यांना खात्री पटली आहे की ते एकमेकांना डेट करत आहेत. 


काल रात्री मुंबईत Jio World Plazaचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला संपूर्ण बॉलिवूड जगत आणि अनेक क्रिकेटर्सनीही सहभाग घेतला होता. यादरम्यान शुबमन गिल देखील स्पॉट झाला होता, जिथे तो सारा तेंडुलकरसोबत दिसत होता. ही दोघं एकत्रच मॉलमधून बाहेर पडणार तितक्यात शुबमनची नजर समोर असलेल्या कॅमेराकडे गेली अन् त्याने हळूच कलटी मारली. व्हिडीओमध्ये सारा आणि शुबमन जिओ वर्ल्ड प्लाझा येथील कार्यक्रमातून बाहेर पडताना दिसत आहेत, पण बाहेर उभ्या असलेल्या पापाराझींना पाहताच ते तिथेच थांबले, त्यानंतर दोघेही वेगळे झाले.   

Web Title: Shubman Gill, Sara Tendulkar keeping affair private before making it official? duo avoid getting clicked together, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.