टीम इंडियाचा ‘प्रिन्स’ शुभमन गिल याला टी-20 वर्ल्ड कपपूर्वी मोठा धक्का बसला आहे. सातत्याने संधी मिळूनही अपेक्षित कामगिरी न करता आल्यामुळे बीसीसीआय निवडकर्त्यांनी त्याला टी-20 संघाबाहेर केलं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वनडे आधी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पंजाबकडून मैदानात उतरणार गिल
आता गिल न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना दिसणार आहे. तो पंजाबकडून विजय हजारे ट्रॉफीत खेळणार असून, व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये फॉर्म परत मिळवण्यावर त्याचा भर असेल. बीसीसीआयकडून आणखी काही अनपेक्षित निर्णय झाला नाही, तर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व शुभमन गिलकडेच असेल. ही मालिका ११ जानेवारीपासून सुरू होणार आहे.
...तर शुभमन गिल वर्सेस अर्जुन तेंडुलकर यांच्यात रंगेल सामना!
दरम्यान, विजय हजारे ट्रॉफीत पंजाबचा संघ ३ जानेवारीला सिक्कीम आणि ६ जानेवारीला गोवा विरुद्ध खेळणार आहे. या दोन्ही सामन्यांत शुभमन गिल मैदानात उतरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गोवा विरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल विरुद्ध अर्जुन तेंडुलकर असा चर्चेचा सामना पाहायला मिळू शकतो.
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
दोघांमधील लढतीत कोण भारी ठरणार? तिसरी व्यक्ती पुन्हा चर्चेत येणार का?
याआधी आयपीएलमध्ये हे दोघे आमनेसामने आले होते आणि तेव्हा ‘सारा… जमाना’ एका वेगळ्याच कारणामुळे त्यांच्या खेळाकडे पाहत होता. मात्र यावेळी हा सामना लाईव्ह पाहता येणार नाही. विशेष म्हणजे दोघेही सध्या खराब फॉर्ममधून जात आहेत. अशात जर हे दोघे समोरासमोर आले, तर दोघांत कोण भारी ठरणार? आणि ते समोरासमोर आल्यावर ती तिसरी व्यक्ती पुन्हा चर्चेत येणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
गिलशिवाय KL राहुल आणि जड्डूही देशांतर्गत क्रिकेट खेळणार
शुभमन गिलशिवाय अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा हा देखील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सौराष्ट्र संघाकडून खेळताना दिसणार आहे. तो ६ आणि ८ जानेवारीला सर्व्हिसेस आणि गुजरातविरुद्ध मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. केएल राहुलही कर्नाटकच्या संघाकडून त्रिपुरा आणि राजस्थानविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. हे सामनेही ३ आणि ६ जानेवारीला होणार आहेत.