Shubman Gill : शुबमन गिलचा इंग्लंडमध्ये दबदबा! १४ चेंडूंत ६० धावा कुटताना झळकावले पहिले शतक, Video

Shubman Gill makes a maiden century : भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल याने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कौंटी अजिंक्यपद स्पर्धेत आपला दबदबा दाखवून दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 03:52 PM2022-09-27T15:52:47+5:302022-09-27T15:53:13+5:30

whatsapp join usJoin us
Shubman Gill makes a maiden Glamorgan century, 123 balls, 12 fours, 2 sixes, Glamorgan 245/4 against Sussex, Video | Shubman Gill : शुबमन गिलचा इंग्लंडमध्ये दबदबा! १४ चेंडूंत ६० धावा कुटताना झळकावले पहिले शतक, Video

Shubman Gill : शुबमन गिलचा इंग्लंडमध्ये दबदबा! १४ चेंडूंत ६० धावा कुटताना झळकावले पहिले शतक, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shubman Gill makes a maiden century : भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल याने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या कौंटी अजिंक्यपद स्पर्धेत आपला दबदबा दाखवून दिला आहे. भारताच्या मर्यादित षटकांचा सदस्य नसल्याने गिलने कौंटी क्रिकेटमध्ये ग्लॅमोर्गन ( Glamorgan) क्लबकडून खेळण्याचा निर्णय घेतला आणि त्याने कौंटीतील पहिले शतक झळकावताना ससेक्सच्या ( Sussex) गोलंदाजांची धुलाई केली. त्याने फक्त १४ चेंडूंत ६० धावांचा पाऊस पाडला.

डेव्हिड लॉयड ( कर्णधार) व एडी बायरॉन यांनी पहिल्या विकेटसाठी ४९ धावा करताना ग्लॅमोर्गनला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. पण, ब्रॅडली करीने संघाला पहिला धक्का देताना बायरॉनला २१ धावांवर बाद केले. लॉयड व शुबमन यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना संघाला सुस्थितीत आणले. लॉयड ६४ चेंडूंत ६ चौकार २ षटकारांसह ५६ धावांत माघारी परतल्यानंतर शुबमनने डाव सावरला. काल दिवसअखेर त्याने ९१ धावा केल्या होत्या. सॅम नॉर्थइस्ट ( १३) व बिली रूट ( २१) हे स्वस्तात माघारी परतले असताना शुबमन खिंड लढवतोय.

आज शुबमनने शतक पूर्ण केले. त्याने १२३ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारांसह शतकी खेळी पूर्ण केली. त्यानंतर त्याने सलग चार चौकार खेचून धावांचा वेग वाढवला. ५२ षटकांपर्यंत शुबमन ११९ धावांवर खेळत होता आणि संघाच्या ४ बाद २७३ धावा झाल्या होत्या.



 

Web Title: Shubman Gill makes a maiden Glamorgan century, 123 balls, 12 fours, 2 sixes, Glamorgan 245/4 against Sussex, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.