Shubman Gill: सारा तेंडुलकर नव्हे, तर सारा अली खानला डेट करतोय शुभमन गिल?, रेस्टॉरंटमध्ये दिसले एकत्र!

Shubman Gill Spoted With Sara Ali Khan: भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल सध्या चर्चेचा विषय ठरतोय. झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेवर यशस्वीरित्या कब्जा केल्यानंतर शुभमन गिलची खरी कसोटी आता इंग्लंडविरुद्ध असणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 08:37 AM2022-08-30T08:37:32+5:302022-08-30T08:39:43+5:30

whatsapp join usJoin us
Shubman Gill Dating Sara Ali Khan India Cricketer Pictured having a Dinner Date with Saif Ali Khans Daughter | Shubman Gill: सारा तेंडुलकर नव्हे, तर सारा अली खानला डेट करतोय शुभमन गिल?, रेस्टॉरंटमध्ये दिसले एकत्र!

Shubman Gill: सारा तेंडुलकर नव्हे, तर सारा अली खानला डेट करतोय शुभमन गिल?, रेस्टॉरंटमध्ये दिसले एकत्र!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Shubman Gill Spoted With Sara Ali Khan: भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल सध्या चर्चेचा विषय ठरतोय. झिम्बाब्वे विरुद्धच्या मालिकेवर यशस्वीरित्या कब्जा केल्यानंतर शुभमन गिलची खरी कसोटी आता इंग्लंडविरुद्ध असणार आहे. काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी शुभमन सध्या इंग्लंडमध्ये आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर शुभमननं प्लेअर ऑफ द सीरिजचा पुरस्कार देखील पटकावला आणि या पुरस्कारासह त्यानं मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्डही मोडीस काढला. यात आता शुभमन गिलचा एक फोटो सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. शुभमन गिल एका मिस्ट्री गर्लसह लंडनमधील रेस्टॉरंटमध्ये डेटवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. नेटिझन्सच्या म्हणण्यानुसार ती मिस्ट्री गर्ल बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान असल्याचा दावा केला जात आहे. 

मीडिया रिपोर्टनुसर शुभमन गिल लंडनमध्ये बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानसोबत पाहायला मिळाला. एका रेस्टॉरंटमध्ये दोघं एकत्र दिसले. शुभमनसोबत असलेली व्यक्ती सारा तेंडुलकर असल्याचा अंदाज सर्व व्यक्त करत होते. शुभमनसोबत असलेल्या व्यक्तीचं नाव सारा असल्याचं वृत्त समोर आलं. पण ही सारा सचिन तेंडुलकर यांच्या कन्या नसून बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान असल्याचं सांगण्यात येत आहे. माहिती समोर येताच सोशल मीडियात सारा अली खान आणि शुभमन गिल यांच्या रिलेशनशीपबाबतच्या वृत्तानं धुमाकूळ घातला आहे. 

शुभमन आणि साराच्या व्हायरल फोटोनंतर नेटिझन्सची नजर शुभमनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटकडे खिळली. काही दिवसांपूर्वी शुभमननं आपण गेलेल्या दिवसांसाठी (भूतकाळासाठी) नव्हे, तर भविष्यासाठी अत्यंत प्रमाणिक आहोत, अशा आशयाचं कॅप्शन पोस्ट केलं होतं. या कॅप्शनचा संबंध नेटिझन्स थेट सारा तेंडुलकरशी जोडत आहेत. कारण शुभमन आणि सारा तेंडुलकर एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या याआधीही अनेकदा समोर आल्या आहेत. अर्थात यावर दोघांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी आजवर झालेली नव्हती. 

काय आहे या व्हायरल फोटोचं सत्य?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुभमन गिल आणि सारा अली खान यांनी लंडनमधील एका रेस्टॉरंटमध्ये डिनर केला. पण काहींनी हा फोटो दुबईचा असल्याचाही दावा केला आहे. पण काहींनी तो लंडनमधील रेस्टॉरंटचा फोटो असल्याचं म्हटलंय. मात्र, फोटो कुठलाही असो, सारा आणि शुभमनचा हा फोटो आश्चर्याचा धक्का देणारा ठरला आहे. अर्थात दोघं खरंच एकमेकांना डेट करत आहेत का याची सत्य माहिती ते स्वत:च देऊ शकतात. किंवा या व्हायरल फोटोमागे आणखी काही वेगळंच सत्य आहे ज्याबाबत सर्वजण अजूनही अनभिज्ञ आहेत. पण सध्यातरी व्हायरल फोटोमधली ती मिस्ट्री गर्ल सारा अली खानच असल्याचा दावा सोशल मीडिया युझर्सकडून केला जात आहे.

Web Title: Shubman Gill Dating Sara Ali Khan India Cricketer Pictured having a Dinner Date with Saif Ali Khans Daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.