- हर्षा भोगले लिहितात...
चेन्नईच्या दमट हवामानात खेळल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या खेळाची दिशा बदललेली दिसते. कोलकाता येथील हवामान चेन्नईच्या तुलनेत वेगळे असले तरी दोन्ही शहरांमधील खेळपट्टीत फरक आहे. गोलंदाजी तर केकेआरची मूळ समस्या आहे.
उत्कृष्ट फॉर्ममध्ये असताना इडन गाडन्सवर सुनील नरेनची चार षटकातील गोलंदाजी महत्त्वपूर्ण ठरायची. सध्या मात्र तो तितका धोकादायक वाटत नाही. सोबतच कुलदीपला देखील एकही बळी मिळाला नाही. कुलदीपबाबत असे फार कमी पहायला मिळते. सामन्यात निकाल लावणाऱ्या गोलंदाजांची कर्णधाराला गरज असते. सध्या मात्र असा कुणीही गोलंदाज दृष्टीस पडत नाही. याच कारणांमुळे सामने जिंकण्यासाठी फलंदाजांवर विसंबून राहावे लागत आहे.
कोलकाता संघासाठी चांगली बाब अशी की दिल्ली कॅपिटल्सच्या तुलनेत चेन्नई सुपरकिंग्सला ईडनच्या खेळपट्टीवर चेंडूचा अवांतर वेग आणि उसळी पचनी पडली नाही. धोनीने हे मान्य केले. कोलकाता संघासाठी ही बाब समाधानकारक मानली जाईल. आपली मोहीम पुन्हा विजयी रुळावर आणण्याची संधी त्यात दडलेली असेल.
दुखापती कुणालाही लाभ पोहोचवित नाही. तथापि एक सत्य असेही आहे की कोलकाता संघाचा फलंदाज शुभमान गिल याला याच कारणांमुळे वरच्या स्थानावर फलंदाजीची संधी मिळाली. शुभमानने कौशल्य आणि क्षमतेचा परिचय दिला. त्याच्या फटकेबाजीत सहजता जाणवते शिवाय तो कुठलीही घाई करीत नाही. खेळताना तो सामन्यापूर्वी सराव करीत असल्यासारखा जाणवतो. त्याला आता पुन्हा सहाव्या किंवा सातव्या स्थानावर खेळविण्यात येणार नाही. फिनिशरची जबाबदारी नितीश राणाकडे सोपविली जाईल.
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला चेन्नई सुपरकिंग्स संघ विजयाचा मार्ग चोखाळत असेल. पण कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे ते रौद्र रूप पाहणे आश्चर्यकारक होते. यामुळे हे सिद्ध होते की शांतचित्त चेहºयाआड किती दडपण असते. चेन्नईने एखादा सामना गमविला तरी फरक जाणवणार नाही, पण कोलकाता संघ सलग दुसरा सामना हरल्यास या संघाचा पुढील मार्ग कठीण होणार हे नक्की.