Join us

श्रेयस अय्यर आणि शिवम दुबेने बीसीसीआयच्या खांद्यावर बंदूक ठेवत विश्रांती घेतली? काय होणार कारवाई

आता श्रेयस आणि शिवम यांच्या नेमकी कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 19:34 IST

Open in App

मुंबई : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईला रेल्वेकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. या सामन्यात मुंबईचे श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे हे दोघेही खेळले नाहीत. या दोघांनी, आम्हाला बीसीसीआयने विश्रांती घेण्याचे सांगितले आहे, असे कळवले. त्यामुळे त्यांना मुंबईच्या संघात खेळवण्यात आले नाही. पण मुंबईच्या क्रिकेट संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती मागवल्यावर असे काही असल्याचे निष्पन्न झाले नाही. त्यामुळे श्रेयस आणि शिवम यांनी बीसीसीआयच्या खांद्यावर बंदूक ठेवून विश्रांती घेतली, असे चाहते म्हणत आहेत. त्यामुळे आता श्रेयस आणि शिवम यांच्या नेमकी कोणती कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने एक वृत्त प्रसारीत केले होते. या वृत्तामध्ये मुंबई क्रिकेट संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, " श्रेयस आणि शिवम यांनी आम्हाला सांगितले की, बीसीसीआयने आम्हाला विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पण जेव्हा आम्ही निवड समितीकडे याबाबत विचारणा केली तेव्हा त्यांनी अशी कोणताही सुचना केली नसल्याचे आम्हाला सांगितले."

हे अधिकारी पुढे म्हणाले की, " मुंबईसाठी ही दुर्दैवी गोष्ट आहे. कारण आता श्रेयस आणि शिवम यांना विश्रांती घेण्यास नेमके कोणी सांगितले, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संघटनेच्या आगामी बैठकीमध्ये आम्ही हा विषय मांडणार आहोत. त्यामध्येच या दोघांवर कोणती कारवाई करण्यात येऊ शकते, हे ठरवले जाईल."

मुंबईच्या संघाने मस्त डबा घातला; मानहानीकारक पराभवानंतर विनोद कांबळीने केली जहरी टीकामुंबई : रेल्वेकडून मुंबईच्या संघाला काल मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीने मुंबईच्या संघावर खरमरीत टीका केली आहे. ही जहरी टीका करत असताना कांबळीने मुंबईच्या संघाची हवाच काढून टाकली आहे.

मुंबईच्या संघावर या सामन्यातील पहिल्या डावात ११४ धावांवर पराभूत होण्याची नामुष्की ओढावली. त्यानंतर मुंबईवर या सामन्यात दहा विकेट्सने पराभूत होण्याची नामुष्की ओढावली. त्यामुळे मुंबईच्या संघावर जोरदार टीका सुरु झाली आहे.

कांबळीने ट्विटरच्या माध्यमातून मुंबईच्या संघावर टीका केली. कांबळी म्हणाला की, " मुंबईच्या संघाने मस्त डबा घातला. मुंबईच्या संघाकडून फार वाईट कामगिरी पाहायला मिळाली. श्रेयस अय्यर आणि शिवम दुबे हे दोघेही सध्या संघात नाहीत. पण यापुढे जेव्हा शक्य असेल तेव्हा संघाची चांगली कामगिरी पाहायला आवडेल."

 

टॅग्स :रणजी करंडकमुंबईबीसीसीआय